शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, भाविकांची मोठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 18:54 IST

सचिन मोहिते देवरूख: राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चि. मार्लेश्वर आणि चि.सौ.का. ...

सचिन मोहितेदेवरूख: राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चि. मार्लेश्वर आणि चि.सौ.का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) सोमवारी दुपारी हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. या विवाह सोहळा प्रसंगी भाविकांनी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोठी गर्दी होती. विवाहसोहळा संपन्न होताच उपस्थित भाविकांनी हर हर मार्लेश्वरचा जयघोष करत सह्याद्रीच्या पर्वतरांगा दणाणून सोडल्या.  मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि.१२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मार्लेश्वरचा हा वार्षिक यात्रोत्सव सुप्रसिद्ध आहे. दि. १२ रोजी आंगवली मठात प्रथेप्रमाणे मार्लेश्वर देवाचा मांडव घालून या यात्रोत्सवाची सुरूवात झाली. दि.१३ रोजी रात्री आंगवली मठात मार्लेश्वर देवाला हळद लावण्यात आली व घाणा भरण्यात आला. दि. १४ रोजी सायंकाळी मठात यात्रा, दिंड्या, कावड, पालख्यांचे आगमन, कल्याणपुर्व विधी व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रस्थान झाले. याअगोदर देवरूखच्या व्याडेश्वराची पालखी, आंबव व लांजा येथील दिंड्या तर वांझोळेची कावड या सर्वांनी पवईला जाण्यासाठी प्रयाण केले.  पवईतून मार्लेश्वराची पालखी, यजमान व्याडेश्वराची पालखी, दिंड्या व कावड या सर्वांनी शिखराकडे प्रस्थान केले. याअगोदर साखरप्याची गिरिजादेवीची पालखी शिखरावर पोहचली होती. सर्वजण शिखरावर पोहचल्यानंतर सोमवारी सकाळी मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर मार्लेश्वर-गिरिजादेवीच्या लग्नाचा मुहुर्त काढण्यात आला. प्रत्यक्षात विवाहसोहळ्याला सुरूवात होण्यापुर्वी रायपाटणकर स्वामी व लांजेकर स्वामी यांना मंदिराजवळ आणण्यात आले. त्यांची पाद्यपूजा झाल्यावर त्रिपूर उजळण्यात आला. यानंतर विवाहसोहळ्याला सुरूवात होण्यापुर्वी तब्बल ३६० मानकऱ्यांना विवाहाचे अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले. लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून विवाहसोहळ्याला मंत्रघोषात प्रत्यक्षात प्रारंभ करण्यात आला. दुपारी १ वाजण्याच्या मुहुर्तावर मंगलाष्टकांनी विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाहसोहळ्याला आमदार शेखर निकम, ठाकरे गटाच्या संपर्क संघटक नेहा माने, माजी जि.प. अध्यक्ष  रोहन बने, परशुराम कदम, युवासेनेचे राज्य सहसचिव प्रद्युम्न माने, भाजपाचे प्रमोद अधटराव, संतोष केदारी, बापू शेट्ये, तहसिलदार अमृता साबळे उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिस निरिक्षक प्रदीप पोवार यांच्यासह पोलिस फाटा तैनात होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग