मराठी नाट्यपरिषदेशी संस्थांनी संलग्न व्हावे

By Admin | Updated: April 13, 2015 00:07 IST2015-04-12T22:14:47+5:302015-04-13T00:07:41+5:30

रत्नागिरीतील रंगसंमेलनात निघाला सूर

The Marathi Natyaprashishiya Institutions should be attached | मराठी नाट्यपरिषदेशी संस्थांनी संलग्न व्हावे

मराठी नाट्यपरिषदेशी संस्थांनी संलग्न व्हावे

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या मध्यवर्ती मुंबई शाखेवर रत्नागिरीतील तीन रंगकर्मी गेली दोन वर्षे कार्यरत आहेत. नाट्य चळवळ सशक्त होण्यासाठी परिषदेतर्फे एकांकिका स्पर्धा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु, खऱ्या अर्थाने नाट्य परिषद बळकट होण्यासाठी जिल्ह्यातील विविध नाट्यसंस्था व त्यांच्या सदस्यांनी परिषदेशी सलग्न होण्याची आवश्यकता आहे, अशी भावना रंगसंमेलनातून व्यक्त करण्यात आली.
मराठी नाट्य परिषद आयोजित रंगसंमेलन कार्यक्रमात हा सूर उमटला. मध्यवर्ती मंडळाच्या नियामक शाखेचे सहकार्यवाह दादा वणजू, सदस्य आसावरी शेट्ये, सतीश दळी व्यासपिठावर उपस्थित होते. व्यासपीठ व प्रेक्षागृहातील रंगकर्मीमध्ये संवाद साधण्यात आला. कोकणात चित्रीकरण वाढत आहे. त्यांना स्थानिक कलाकारांची आवश्यकता भासते. परंतु, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या शिफारशीनुसार कलाकरांची निवड करण्यात येत असल्याने कलांकारांनी आपली माहिती शाखेकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रंगसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी वसंत गंगावणे, प्रा. सुजन शेंड्ये, प्रज्ञा चवंडे यांच्याहस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविक दादा वणजू यांनी केले.सूजन शेंड्ये यांनी मार्गदर्शन करताना सुरूवातीच्या काळात एक दोन संस्था कार्यरत होत्या. मात्र सध्या जिल्ह्यात नाट्यचळवळ फोफावत आहेत भविष्यात ती अधिक वृध्दिंगत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी नाट्यसंस्था व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. संगीत राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारी राधाकृष्ण कलामंच संस्था व वैयक्तिक बक्षिसांमध्ये प्रेरणा दामले, संजय गणपुले, प्रशांत साखळकर, खल्वायनेच्या ‘प्रीतीसंगम’ नाटकातील अजिंक्य पोंक्षे, श्वेता जोगळेकर, सहयोग संस्थेच्या सिध्दी बोंद्रे, संकल्प कलामंचची रौप्यपदक विजेती प्रज्ञा चवंडे, राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागातील नंदू भारती, तसेच सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती झालेले दाक्षायणी बोपर्डीकर व मिलिंद टिकेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘सॉर्केटिस ते दाभोळकर-पानसरे व्हाया तुकाराम’ रिंगण नाट्याचा ६९वा प्रयोग सादर केला. (प्रतिनिधी)

Web Title: The Marathi Natyaprashishiya Institutions should be attached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.