मराठी भाषा दिनी वैविध्यपूर्ण उपक्रम

By Admin | Updated: December 29, 2014 00:01 IST2014-12-28T22:38:46+5:302014-12-29T00:01:10+5:30

रत्नागिरी जिल्हा : शिक्षक परिषद, रत्नागिरी व माध्यमिक शिक्षण विभागाचा उपक्रम

Marathi language diversified activities | मराठी भाषा दिनी वैविध्यपूर्ण उपक्रम

मराठी भाषा दिनी वैविध्यपूर्ण उपक्रम

वाटूळ : कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी साजरा होणारा ‘मराठी भाषा दिन’ यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षक परिषदेच्या रत्नागिरी तालुका व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिनाचे औचित्य साधून विविध तालुकास्तरीय स्पर्धांची व पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये निबंध, काव्यलेखन, वक्तृत्व स्पर्धांचा समावेश आहे.
निबंध स्पर्धा चार गटामध्ये घेण्यात येणार असून, त्यांचे विषय पुढीलप्रमाणे : प्राथमिक गट (५ ते ७) - आई, माझे आवडते पुस्तक, शब्दमर्यादा २०० ते २५० शब्द, माध्यमिक गट (८ ते १०) - स्वच्छ भारत सुंदर भारत माझी कल्पना, उच्च माध्यमिक गट (११ ते १२) दहशतवाद - भारतापुढील आव्हान, भारतातील निवडणूक समस्या, उपाय.
खुला गट : कवी केशवसुतांच्या सामाजिक कविता, वि. स. खांडेकरांचे साहित्यातील योगदान, साहित्य संमेलन असावे की नसावे. काव्यलेखन स्पर्धा : उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय डी. एड., व बी. एड. महाविद्यालय अशा चार गटांमध्ये विषय कायदा, पाणी. खुला गट - मराठी माझी मायबोली, लेक
वाचवा.
वक्तृत्व स्पर्धा : उच्च माध्यमिक व डी. एड. कॉलेज - विषय - नामदेव ढसाळ एक ज्वालाग्रही, मराठी वाचविण्यासाठी माझी भूमिका - वेळ ७ मिनिटे. वरिष्ठ महाविद्यालय व बी. एड. कॉलेज विषय - भ्रष्टाचारमुक्त भारत एक आव्हान, मराठी टिकविण्यासाठी माझी भूमिका - वेळ ९ मिनिटे.
खुला गट - माझे आवडते साहित्यिक - कवी कुसुमाग्रज, मराठी वाचविण्यासाठी माझी भूमिका - वेळ. ११ मिनिटे. खुल्या गटातील स्पर्धेमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर तसेच समाजातील कोणीही कर्मचारी भाग घेऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे आनंद शेलार यांच्याकडे दि. ३० डिसेंबरपर्यंत नोंदवावीत.
तसेच निबंध व काव्य आनंद शेलार, शंखेश्वर नगर, ‘सी’ विंग, आरोग्य मंदिर या पत्त्यावर १० जानेवारीपर्यंत पोहचतील, असे पाठवावेत.
तसेच मराठी, इंग्रजी, हिंदी व संस्कृतया भाषांच्या संवर्धनासाठी ज्या शिक्षकांनी भरीव कार्य, विविध प्रकल्प, उपक्रम राबवून भाषा टिकविण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शिक्षकांना ‘भाषा अभिवृद्धी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशा शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या शिफारशीसह आपली वैयक्तिक माहिती महेश गांगण व उज्ज्वल शिंदे, उमरे हायस्कूल, हरचिरी - रत्नागिरी यांच्याकडे १० जानेवारीपूर्वी पाठवावीत, असे शिक्षक परिषदेने कळविले आहे. (वार्ताहर)

Web Title: Marathi language diversified activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.