शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: संततधार पावसाने काही रस्ते पाण्याखाली, वाहतूक झाली होती ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:15 IST

कणकवली तालुक्यात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर येऊन शेजारील रस्त्यावर आल्याने काही काळ ते रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.पाऊस थांबल्यावर पाणी ओसरल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. सोमवारी दिवसभर अधून मधून किरकोळ सरी कोसळत असल्या तरी पावसाने तशी उसंतच घेतली होती. रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील जानवली, गडनदी तसेच अन्य नद्यांची पात्रे तुडुंब भरून वाहत होती. काही ठिकाणी पात्राबाहेर पुराचे पाणी आले होते. तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर सदृश पाणी आल्याने आजूबाजूच्या परिसराला पाण्याचा वेढा पडला होता. तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी दुपारनंतर पाणी बऱ्यापैकी ओसरले होते. खबरदारी म्हणून महसूल विभागाबरोबरच पोलिस प्रशासन देखील विविध ठिकाणी सक्रिय होते.कणकवली आचरा मार्गावर वरवडे फणसवाडी येथे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. अर्थात या रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण न झाल्याने काही प्रमाणातच दुचाकी तसेच चारचाकी त्या मार्गावरून जात असतात. त्या मार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास वरवडे येथील रस्त्यावर आलेले पाणी ओसरले. मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने पूरस्थिती पूर्वपदावर आली होती.शालेय बसफेरी पर्यायी मार्गाने वळविलीहळवल गावातील भाकरवाडी-शिवडाव जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी आले होते. सोमवारी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास काहीसे पाणी कमी झाले होते. मात्र मार्गावरील वाहतूक ठप्प होती. सोमवारपासून शाळा देखील सुरू झाल्या. मात्र रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे शालेय बसफेरी देखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला.पुराचे पाणी रस्त्यावर, वाहतूक काही काळ ठप्पसोमवारी सकाळी हरकुळ बुद्रूक भाट दुकान नजीक पुलावरून पाणी वाहत होते. जानवली व गडनदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे जानवली नदीवरील गणपती सान्यावरही पाणी वाढले होते. तर शिवडाव, हळवल या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.