शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कणकवली पंचायत समिती सभापती पदी मनोज रावराणे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:33 IST

panchayat samiti Kankavli Sindhudurg- कणकवली पंचायत समिती सभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडप्रक्रियेत मनोज रावराणे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. तहसीलदार तथा पीठासन अधिकारी आर​. जे.पवार यांनी ही निवड जाहीर केली आहे.

ठळक मुद्देकणकवली पंचायत समिती सभापती पदी मनोज रावराणे यांची बिनविरोध निवडकणकवली पंचायत समितीमध्ये ​१६ पैकी ​१५ सदस्य राणे समर्थक

कणकवली : ​कणकवलीपंचायत समिती सभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडप्रक्रियेत मनोज रावराणे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. तहसीलदार तथा पीठासन अधिकारी आर​. जे.पवार यांनी ही निवड जाहीर केली आहे.कणकवली पंचायत समितीमध्ये ​१६ पैकी ​१५ सदस्य राणे समर्थक आहेत. त्यामुळे ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध होणार हे यापूर्वीच निश्चित झाले होते. मंगळवारी मनोज रावराणे यांच्या नावावर भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सभापती निवड प्रक्रियेसाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत मनोज रावराणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकार्‍यांनी जाहीर केले.मनोज रावराणे हे राजकीय व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे नाव म्हणून ओळखले जाते. आमदार नितेश राणे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. नितेश राणे यांच्यासोबत युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकारणात उडी घेतलेल्या मनोज रावराणे यांना तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून बहुमान मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मनोज रावराणे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच आनंदोत्सव साजरा केला. भाजपाचे झेंडे व फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात पंचायत समितीचा परिसर निणादून गेला होता. यावेळी लोरे, घोणसरी , वाघेरी, फोंडा आदी परिसरातील अनेक ग्रामस्थ कणकवली येथे मनोज रावराणे याना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, सुजाता हळदीवे, उपसभापती दिव्या पेडणेकर, माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, पंचायत समिती सदस्या स्मिता मालडीकर, सुचिता दळवी, सुजाता हळदिवे , तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,भाग्यलक्ष्मी साटम, महेश लाड, सुभाष सावंत, माजी उपसभापती महेश गुरव, लोरे सरपंच अजय रावराणे, वाघेरी सरपंच संतोष राणे, भाजपाचे प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत,बाबासाहेब वर्देकर, स्वप्निल चिंदरकर , उपसरपंच अनंत रावराणे,तंटामुक्ती अध्यक्ष महेश रावराणे, शक्ती केंद्रप्रमुख नरेश गुरव,माजी सरपंच सुमन गुरव, आदी उपस्थित होते.सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार !माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लावण्यात येईल. सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन कणकवली तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न राहील . अशी प्रतिक्रिया मनोज रावराणे यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग