शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

व्हेलच्या बचाव कार्यात मालवणच्या तरुणांची कर्तबगारी, अंगीभूत समुद्री कौशल्य आले कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:37 IST

संदीप बोडवे मालवण: गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर आलेल्या व्हेलला समुद्रात सुखरूप सोडण्यात दुर्दैवाने अपयश आले असले तरीही, या बचाव कार्यात ...

संदीप बोडवेमालवण: गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर आलेल्या व्हेलला समुद्रात सुखरूप सोडण्यात दुर्दैवाने अपयश आले असले तरीही, या बचाव कार्यात मालवणच्या युवकांनी दाखविलेली कर्तबगारी विशेष कौतुकास्पद ठरली. गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या बोट क्लबचे व्यवस्थापक विवान राणे, सह व्यवस्थापक विशाल राठोड आणि त्यांच्या मालवण येथील टीम ने व्हेलला वाचविण्यासाठी आपले अंगीभूत असलेले समुद्री कौशल्य पणाला लावत प्रयत्नांची मोठी पराकाष्ठा केली. त्यांच्या या कामगिरीचे सागरी संशोधक सारंग कुलकर्णी यांच्या सह अनेकांनी कौतुक केले आहे. गणपतीपुळे येथे व्हेलच्या बचाव कार्यात वन विभागा सोबत सहभागी झालेल्या अन्य यंत्रणांमध्ये तेथील एमटीडीसी बोट क्लबच्या टिमचाही समावेश होता. या टीम मध्ये बोट क्लबचे व्यवस्थापक जे मरीन बायोलॉजिस्ट आणि डाईव्ह मास्टर असलेले विवान राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कुबा इंस्ट्रक्टर आणि रेस्क्यू डायव्हर विशाल राठोड, जेटस्की इंस्ट्रक्टर अक्षय केरकर, वैभव केळुस्कर, गणेश राऊळ, दत्ताराम तोरसकर यांचाही सहभाग होता. मालवणच्या या टीम मधील सदस्यांनी तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटिक स्पोर्ट्स (इसदा) मध्ये वॉटर अॅडव्हेंचर ॲक्टिव्हीटीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रयत्नांची पराकाष्ठाविशाल राठोड म्हणाले, सुरुवातीला आम्हाला बोट क्लब मधून समुद्रात काही तरी तरंगत असल्याचे आढळले. थोड्याच वेळात ते किशोरवयीन व्हेल आल्याचे लक्षात आले. त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून होतो. परंतु किनाऱ्यालगत येताच आमच्या टीम ने लगेचच त्याच्या बचावाचे प्रयत्न सुरू केले. उपलब्ध सामुग्री आणि स्पीड बोटींच्या सहाय्याने आम्ही त्याला समुद्रात सोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र हा व्हेल पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येत असल्यामुळे आमचे प्रयत्न तोकडे पडले. आम्ही तात्काळ वन अधिकाऱ्यांना या बाबत कळविले आणि त्यांच्या सोबत व्हेलला समुद्रात सोडण्याच्या कामात सामील झालो. मदत आणि सामुग्री उपलब्ध होई पर्यंत लागलेल्या कालावधीत किनाऱ्यावर पडलेल्या व्हेलची त्वचा सूर्य किरणांमुळे भाजू नये म्हणून क्लब मधील बेडशिट ओल्या करून व्हेलच्या अंगावर पसरविल्या. अनेक कारणे शक्यविवान राणे म्हणाले, व्हेलच्या डोक्यात असलेल्या इको साऊंडीग सिस्टीम मध्ये झालेल्या बिघडासह व्हेल किनाऱ्यावर येण्याची अनेक कारणे असू शकतात. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समुद्राच्या पाण्यात अपवेलिंग होत असते. यातून समुद्रात समुद्री जीवांसाठी पोषक तत्वे तयार होतात. यामुळे छोटे मासे व त्यांना खाण्यासाठी मोठे मासे किनाऱ्यालगत येतात. व्हेल च्या बचाव कार्यामुळे अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्यात ज्या भविष्यात दिशा दर्शक ठरतील.अंगीभूत गुणबचाव पथकाचे कौतुक करताना सारंग कुलकर्णी म्हणाले, मालवणच्या युवकांमध्ये सागरी जीवांच्या संवर्धनाचे अंगीभूत गुण आहेत. याचाच या उदाहरणावरून प्रत्यय आला. त्यांचा मला अभिमान आहे. या युवकांमध्ये आलेले सागरी कौशल्य भविष्यात महत्त्वाची भूमिका बजाताना दिसणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग