मालवण-मुंबई बस उलटून सात गंभीर
By Admin | Updated: September 15, 2014 23:23 IST2014-09-15T23:02:30+5:302014-09-15T23:23:46+5:30
आरवलीनजीकची दुर्घटना

मालवण-मुंबई बस उलटून सात गंभीर
देवरुख/आरवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शिंदेआंबेरी येथे एस.टी.चा बे्रक अचानक अडकल्याने मालवण डेपोची बस उलटून सात प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना आज, सोमवारी दुपारी २ वाजता
घडली.मानसी साळुंखे (वय ३०, रा. चिपळूण), संस्कृती साळुंखे (८), वसंत राणे (७३, रा. कणकवली), गणपत साळगावकर (८६, रा. मालवण), मालती गणपत साळगावकर (८१), अर्चना आत्माराम कांबळे (४६) आणि आत्माराम कांबळे (५०, रा. म्हाबळे) हे प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये मालवण डेपोचे बसचालक आनंद दयाळ पवार (४५, रा. वायरी-मालवण) यांनी दिली. पवार आपल्या ताब्यातील बस मालवणहून मुंबईला घेऊन जात होते. ही बस आरवलीनजीकच्या शिंदेआंबेरी येथे आल्यानंतर पवार यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ब्रेक अचानक अडकल्याने बस डाव्या बाजूला पलटी होऊन गाडीतच प्रवासी काहीवेळ अडकून पडले. अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील स्थानिक लोक जमा झाले. त्यांनी गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले. यामधील सात प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. अपघाताची खबर कळताच माखजन दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल एस. एस. भुजबळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मदतकार्य व पंचनामा केला. (प्रतिनिधी/वार्ताहर)