मालवण किल्ला विकणे आहे...
By Admin | Updated: May 8, 2017 16:13 IST2017-05-08T16:13:27+5:302017-05-08T16:13:27+5:30
संतप्त नागरिकांनी फलक हटविले

मालवण किल्ला विकणे आहे...
आॅनलाईन लोकमत
मालवण, दि. 0८ : मालवण किल्ला विकणे आहे, संपर्क साधावा, अशा आशयाचे फलक मालवण येथील चार ठिकाणी लावल्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने ते फलक हटविले.
मालवण किल्ला विकणे आहे, उसनी प्रेरणा समिती आणि संबंधितांकडे संपर्क साधावा, अशा आशयाचे फलक मालवण बसस्थानक, भरड नाका, बंदर जेटी आणि कुडाळकर मार्गावर लावण्यात आल्यामुळे मालवणचे नागरिक संतप्त झाले. त्यांनी ही माहिती पोलिसांना देत त्यांच्या मदतीने ते फलक काढून टाकले. यासंदर्भात शिवप्रेमींमधून तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.