मालवणात दोन लाखांचे नुकसान
By Admin | Updated: May 11, 2014 00:00 IST2014-05-11T00:00:13+5:302014-05-11T00:00:13+5:30
मालवण : गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे मालवण तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. तालुक्यातील अनेक भागात जोरदार

मालवणात दोन लाखांचे नुकसान
मालवण : गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे मालवण तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसामुळे घरांचे व झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासन दरबारी तालुक्यात २ लाखांची नुकसानी झाल्याची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसाने तालुक्यात दोन दिवस तडाखा दिला तर तोंडवळी, मसुरे या भागाला चक्रीवादळाचा फटका बसला. तालुक्यात बुधवारी ९ मिमी तर गुरुवारी ४३ मिमी पावसाची नोंद झाली. तोंडवळी, मसुरे, हडी या भागात मोठे नुकसान झाले. हडी येथील जयश्री यशवंत कवटकर, विठोबा सखाराम गावकर, कल्पना गणेश गावकर, पुंडलिक श्रीधर शेडगे, हाजी शेख आदींच्या घरांचे सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)