शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जनतेला अत्यल्प दरात वाळू उपलब्ध करून द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:44 IST

mns, sand, sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळूच्या भरमसाठ दर वाढीमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प अवस्थेत आहेत.ज्याचा थेट परिणाम बांधकाम कामगारांच्या रोजी - रोटीवर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू गोवा राज्यात विकली जात असल्याने सिंधुदुर्ग मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील जनतेला अत्यल्प दरात वाळू उपलब्ध करून द्या ! मनसेची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वाळूच्या भरमसाठ दर वाढीमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प अवस्थेत आहेत.ज्याचा थेट परिणाम बांधकाम कामगारांच्या रोजी - रोटीवर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू गोवा राज्यात विकली जात असल्याने सिंधुदुर्गमनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात आले.एकीकडे वाळूमाफिया व भ्रष्ट अधिकारी , तलाठी व मंडळ तलाठी आधिकारी यांच्या संगनमताने जिल्ह्यातील वाळूचा दिवसा ढवळ्या गोवा राज्यात पुरवठा होतोय तर दुसरीकडे जिल्ह्यातील जनतेला चोरट्या वाळूचे दर परवडत नसल्याने घर बांधकाम थांबले आहे.जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय रेंगाळला असून ज्याचा फटका बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे . देवली , आंबेरी , चिपी , कवठी , कालावल खाडी आदी क्षेत्रात होणाऱ्या अवैध वाळू उपशाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर प्रतिबंध घालुन अधिकृत वाळूची लिलाव प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील जनतेला अल्प दरात वाळू पुरवठा व्हावा या मागणींसाठी मंगळवारीजिल्हाधिकारी कार्यलयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.याबाबत निवासी जिल्ह्याधिकारी , खनिकर्म आधिकारी व मनसे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होऊन कठोर कारवाई करण्याची ग्वाही महसूल प्रशासनाने दिली.पूलाच्या परिसरात वाळू उत्खनन होत असल्याने पुलाला धोका निर्माण झालेला आहे. तर काही ठिकाणी खार बंधाऱ्यांची धुप होत आहे.प्रशासन रॅम्प तोडीची कारवाई करते . मात्र बेकायदेशीर होड्या आणि परराज्यातील बेकायदेशीर वास्तव्य करणारे स्थलांतरित कामगार यांच्यावर कारवाई करत नाही. यामुळे वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.खाडी परिसरातील पारंपरिक रहिवाशांना सी आर झेड चे निर्बाध लावले जातात . मात्र वाळूचे अवैध रॅम्प बांधकाम तलाठ्यांच्या डोळ्यांदेखत केले जाते.प्रशासन कारवाई करत नसल्यास मनसे कायदा हातात घेईल. तसेच वेळीच कठोर कारवाई न झाल्यास मनसे मोर्चा काढून या भ्रष्ट यंत्रणेला जाब विचारील . असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला. ' या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय , वाळू आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची , एकदाच घुसणार मनसेच दिसणार ' अशा घोषणांनी मनसेने परिसर दणादून सोडला.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे , सचिन तावडे , दत्ताराम बिडवाडकर , कुणाल किनळेकर , राजेश टंगसाळी , बाबल गावडे , विनोद सांडव , आपा मांजरेकर , गुरू गवंडे , चंदन मेस्त्री , बाळा पावसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आंबेरी , देवली परिसरातील ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते .

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी