शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार, जिल्हा पत्रकार संघातर्फे घोषणा, विविध पुरस्कारांचे पत्रकार दिनी ६ जानेवारीला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:21 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना प्रेरणा देणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांनी केली.  लोकमतचे सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देअजित सावंत, देवयानी वरसकर, संतोष सावंत यांना पुरस्कार ६ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या पत्रकार दिन सोहळ्यात वितरण पत्रकार भवनाचे भूमिपूजन लवकरच

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना प्रेरणा देणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांनी केली.  लोकमतचे सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

कणकवलीतील अजित सावंत यांना उत्कृष्ट पत्रकार, जिल्हा मुख्यालयातील देवयानी वरसकर यांना वरिष्ठ पत्रकार, सावंतवाडीतील संतोष सावंत यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या पत्रकार दिनाच्या सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे .

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पत्रकार निवड समितीचे अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, मागील वर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ठाकूर आदींच्या उपस्थितीत या निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. यानंतर नाईक यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते.

जिल्हा पत्रकार संघाने आणखी दोन पत्रकारांना विशेष गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान असलेले तुकाराम नाईक आणि पत्रकार संघाच्या सुरुवातीच्या काळापासून योगदान असलेले शिरोडा येथील मोहन जाधव यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.पत्रकार भवनाचे भूमिपूजन लवकरचयावर्षी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार होता. मात्र या कामाच्या निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम आता फेब्रुवारी महिन्यात केला जाईल, असेही यावेळी गजानन नाईक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गreporterवार्ताहर