शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात जमिनी जाणा-या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळणार- महेश जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 15:31 IST

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात ज्या देवस्थान समितीच्या जमिनी जात आहेत त्या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी चर्चा केली.

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात ज्या देवस्थान समितीच्या जमिनी जात आहेत त्या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी चर्चा केली. देवस्थान समितीचा एकच ना हरकत दाखला देण्याची मागणी केली.काळसेकर यांनी जाधव यांची कोल्हापूर येथे देवस्थान कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अभिषेक चव्हाण आदी उपस्थित होते. जाधव यांनी जिल्हा दौ-यावर येऊन जिल्ह्यातील देवस्थाने सुरळीत चालावीत यासाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात तसेच जिल्ह्यातील सर्व देवस्थानांना टप्प्याटप्प्याने भेटी देण्या संदर्भात काळसेकर यांनी विनंती केली.छोट्या मोठ्या गैरसमजुती, कायद्यातील अज्ञान अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक देवस्थान उपसमित्यांमध्ये वाद आहेत. त्यावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी जाधव यांनी जातीने लक्ष घालावा अशी आग्रहाची मागणी काळसेकर यांनी केली आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत महेश जाधव यांनी २२ किंवा २३ डिसेंबरच्या दरम्यान जिल्ह्यात येण्याचे आश्वासन यावेळी दिले. नेरूर, वेतोरे आदी गावातील उपसमित्यांच्या पदाधिका-यांनी अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली महेश जाधव यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.या चर्चेदरम्यान अतुल काळसेकर यांनी महेश जाधव यांचे आणखी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान होणा-या जमीन संपादनात काही देवस्थानांच्या जमिनी संपादित होत आहेत, त्यात देवस्थान समिती ४0 टक्के आणि कुळांना ६० टक्के नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. प्रत्येक खातेदारांना देवस्थान समितीचा नाहरकत दाखला आवश्यक असणार आहे. तो गावातील सर्वच कुळांना मिळून एकच देता येईल का यावर विचार करावा, अशी मागणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग