महेश गवस काँग्रेसचे अधिकृत उमेदवार
By Admin | Updated: September 13, 2014 23:47 IST2014-09-13T23:47:36+5:302014-09-13T23:47:36+5:30
निंबाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

महेश गवस काँग्रेसचे अधिकृत उमेदवार
दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीची सभापतीपदासाठी महेश गवस हेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील व सभापती राष्ट्रीय काँंग्रेस पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास राष्ट्रीय कॉंग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केला.
दोडामार्गातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत निंबाळकर बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा चिटणीस रमेश दळवी, जि. प. सदस्य एकनाथ नाडकर्णी, विधानसभा युवक अध्यक्ष विशांत तळवडेकर आदी उपस्थित होते. यावेळी निंबाळकर म्हणाले, दोडामार्ग पंचायत समितीवर राष्ट्रीय कॉंग्रेस व सेना भाजपाचे समान संख्याबळ आहे. त्यामुळे पंचायत समितीचे सभापती महेश गवस हेच होतील. मात्र, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य जर्नादन गोरे वगळता अन्य दोन्ही सदस्य संपर्काच्या बाहेर आहेत. त्यांनी भाजपा प्रवेश केल्याची चर्चा आहे. हा प्रवेश अधिकृत नक्कीच नसेल कारण जर अन्य पक्षात प्रवेश करायचा असेल तर स्वतंत्र गटाची निर्मिती करावी लागते. पण शुक्रवारी सायंकाळपर्यंत तसा गट तयार करण्यात आला नव्हता. तरीही पक्ष प्रवेश केल्यास कारवाईस ते पात्र ठरतील. (प्रतिनिधी)