शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:21 IST

Shiv sena, mahavikasaghadi, politics, bjp, narayanrane, sindhudurgnews महाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे. तसेच शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करायचे आहे हाच आमचा योजनाबद्ध कार्यक्रम असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेचे आमदार किती? असा सवाल लोक विचारतील म्हणून मुख्यमंत्री पिंजर्‍यातून बाहेर पडत नाही असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे : नारायण राणे शिवसेनेला सिंधुदुर्गातून हद्दपार करण्यासाठी भाजपाचा योजनाबद्ध कार्यक्रम

कुडाळ : महाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे. तसेच शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करायचे आहे हाच आमचा योजनाबद्ध कार्यक्रम असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेचे आमदार किती? असा सवाल लोक विचारतील म्हणून मुख्यमंत्री पिंजर्‍यातून बाहेर पडत नाही असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.केंद्र सरकार ज्या योजना राबवत आहेत त्या योजना राज्य सरकार राबवित नाही. राज्य सरकार काहीच काम करीत नाही याबाबतची माहिती तळागाळातीलवाजनतेपर्यंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोहचवावी असा ठराव आजच्या भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.कुडाळ येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकी नंतर राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजीमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.राणे म्हणाले, कोकणात शिवसेनेचे 11 आमदार आहेत. मात्र येथील रस्ते, पाटबंधारे प्रकल्प, सी वर्ल्ड, विमानतळ तसेच इतर प्रकल्पाबाबत या सरकारने काहीच केले नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री हे पूर्णपणे निष्क्रिय आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाच्या वतीने सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी कोठून आणणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार अशी फक्त शिवसेनेने घोषणा केली. मात्र या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन कुठे? तसेच निधी कुठून देणार? याची तरतूद केली नाही. या महाविद्यालयाची परवानगी ही केंद्र सरकार देते राज्य सरकार परवानगी देत नाही जिल्ह्याला विकास निधी देऊ न शकणारे हे सरकार सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी हॉस्पिटलला कसा काय देणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्ग