शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, शिवसेना आमदाराने व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:30 IST

आमदार दीपक केसरकरांबाबत तसा कोणताही प्रकार घडला नाही

कणकवली :  मातोश्री हे आमचे दैवत तर सेनाभवन हे आमचे घर आहे. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबतच आहोत. कोकणला गद्दारीचा लागलेला कलंक कोकणातील आमच्यासारख्या आमदारांनी आज पुसला आहे. जे गेलेत ते निश्चित परत येतील. राज्यातील महाविकास आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, असा निर्णय वरिष्ठ घेतील, अशा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेचे कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे बुधवारी सकाळी श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने  कणकवलीत दाखल झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते तातडीने मुंबईला रवाना होण्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, कोकणातील सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे आहेत. त्यामुळे जे कुणी गेलेले आहेत ते सर्वजण परत येतील, असा आपणाला ठाम विश्वास आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही काम करतो. त्यांचे आदेश माणून काम करतो म्हणून आम्ही निवडून येतो. त्यामुळे आमच्यासारखा कार्यकर्ता कायमस्वरूपी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे , असेही आमदार वैभव नाईक म्हणाले.केसरकरांबाबत तसा कोणताही प्रकार घडला नाहीमुंबईमध्ये एका हॉटेलमधून बाहेर पडताना शिवसैनिकांनी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना अडवले. या वृत्ताचा आमदार वैभव नाईक यांनी इन्कार केला. आमदार दिपक केसरकर व आपण एकत्रच होतो. उलट दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आहोत. त्यामुळे असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसेच मंगळवारच्या मुंबई येथील वर्षावरील बैठकीला किती आमदार होते ? यावर वरिष्ठच उत्तर देतील. मात्र , उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलेले आहे . त्यामुळे आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यासोबतच आहोत. तसेच महाविकास आघाडीला धोका उद्भवू नये , असा निर्णय वरिष्ठ घेतील . महाविकास आघाडीला धोका आहे, असे आपणाला वाटत नसल्याचे आमदार वैभव नाईक यावेळी  म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVaibhav Naikवैभव नाईक