शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महाविकास आघाडी म्हणजे महाभकास सरकार : शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:56 IST

Ashish Shelar Bjp Sindhudurg- एक वर्ष झाले तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याला. महाविकास नाही महाभकास आघाडी केली आणि कोकणाला काय दिले? चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली शेती अक्षरश: आडवी झाली. नुकसान भरपाईपोटी तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप भाजपचे नेते तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी केला.

ठळक मुद्दे महाविकास आघाडी म्हणजे महाभकास सरकार : शेलार शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने; दांडेली आरोसमध्ये गावभेट दौरा

सावंतवाडी : एक वर्ष झाले तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याला. महाविकास नाही महाभकास आघाडी केली आणि कोकणाला काय दिले? चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली शेती अक्षरश: आडवी झाली. नुकसान भरपाईपोटी तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप भाजपचे नेते तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी केला.दांडेली येथे गावभेट दौऱ्यात शेलार बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, सावंतवाडी युवामोर्चा चिटणीस काका परब, दांडेली बुथ अध्यक्ष संदीप माणगावकर, मनसेचे अमित नाईक तसेच अमोल आरोसकर, सिद्धेश मालवणकर, देवेंद्र माणगावकर, राकेश दळवी, रसिक दळवी, दुर्गेश मोरजकर, कृष्णा पालयेकर, सुनील परब आदी ग्रामस्थ व उमेदवार उपस्थित होते.शेलार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान म्हणजे दोन हजार रुपये जमा होतात. तसेच ग्रामपंचायतला सुद्धा थेट निधी जमा होतो. यापुढेही ग्रामपंचायतीला कुठच्याही निधीची कमतरता भासल्यास आम्ही निधी देऊ, असे आश्वासनही शेलार यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.शिवसेनेच्या धमकीला भीक घालणार नाही : प्रमोद कामतआम्ही पक्षाचे सेवक आहोत. दांडेलीतील आमच्या उमेदवारांचा फॉर्म भरताना शिवसेनेने उमेदवारांवर दबाव आणला होता. परंतु आम्ही कुणाच्याही धमकीला भीक घालत नसून प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी भाजप पक्ष ठामपणे उभा असल्याचे आव्हान, माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी विरोधकांना दिलेआहे. बांदा पॅटर्न दांडेली व आरोस गावात वापरून शिवसेनेची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार प्रमोद कामत यांनी यावेळी बोलून दाखविला.सेनेच्या ग्रामपंचायतींना सुरूंग : संजू परबमाजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते की, संजू परब ग्रामीण भागातील आहे. त्याला सावंतवाडी शहरात मतदान करू नका. परंतु २५ वर्षांनंतर आपल्या नावाने सावंतवाडी नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष बसल्याचे, नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. तालुक्यातील शिवसेनेच्या ग्रामपंचायतीला आता सुरूंग लावून भाजपचा झेंडा फडकविण्याचे काम युवकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाSawantwadiसावंतवाडी