शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या विरोधात: प्रमोद जठार यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:28 IST

bjp, Farmar, Pramod Jathar, sindhudurgnews महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून आता सरकारमधील कार्यकर्ते मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या विरोधात: प्रमोद जठार यांचा आरोपकेंद्रशासनाच्या कृषी विधेयकाला विरोध केल्याबाबत कडाडून टीका

देवगड :    महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून आता सरकारमधील कार्यकर्ते मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे गॉडफादर शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जी संकल्पना मांडली तीच संकल्पना केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्यातून सत्यात आली. मात्र, या कायद्याला महाविकास आघाडी शासनाने विरोध केला आहे. विरोध करणाऱ्या सरकारमधील घटक असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील पान क्रमांक २३८ वाचावे,असा सल्ला भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिला आहे.भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद जठार बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, शहरअध्यक्ष योगेश पाटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आदी उपस्थित होते.केंद्रशासनाच्या कृषी विधेयकाला राज्यशासनाने विरोध केला. यावरून जठार यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला. या विधेयकाला राज्यशासनाने विरोध केला यावरून आत्मचरित्रात भूमिका मांडून शेतकऱ्यांबद्दल दाखवित असलेला एक चेहरा व प्रत्यक्षात सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कायद्याला विरोध करून दाखवित असलेला चेहरा हा आता जनतेने ओळखणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी, सेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आत मूग गिळून गप्प का? असा सवाल जठार यांनी करीत शासनाच्या या धोरणाबाबत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.विरोधासाठी विरोध, सरकारकडून सुडाचे राजकारणहे सरकार केवळ विरोधासाठी विरोध करून सुडाचे राजकारण करीत आहे, असा घणाघात जठार यांनी केला. आघाडी सरकारमधील मंत्र्यांना त्यांचे गॉडफादर असलेले शरद पवार यांचे आत्मचरित्र वाचायला देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्याला विरोध करणाऱ्या सत्तेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा जठार यांनी दिला.

नाणार प्रकल्पाला विरोध करून सेनेने तरुणांचा रोजगार घालविला. कृषी विधेयकाला विरोध करून राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या हिताचा आड येत आहे. यावरूनच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची शेतकरी, ग्राहक, युवावर्ग यांच्याबद्दलची असलेली कळकळ दिसून येत आहे.एकीकडे महाविकास आघाडीचे गॉडफादर शरद पवार यांच्या आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समिती ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल खुल्या बाजारपेठेत विकावा अशी संकल्पना मांडली. हीच संकल्पना मोदींनी कृषी कायद्यातून सत्यात आणली.

टॅग्स :FarmerशेतकरीPramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग