शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

महाराष्ट्र निवडणूक निकालः भाजपाच्या नितेश राणेंनी करून 'दाखवलं'; शिवसेनेचे सतीश सावंत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:46 IST

गेल्या काही दिवसांपासून कणकवली मतदारसंघ चर्चेत राहिला आहे.

कणकवलीः गेल्या काही दिवसांपासून कणकवली मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात भाजपा उमेदवार नितेश राणे आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्यात अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत नितेश राणेंनी 20 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी मताधिक्यांची घोडदौड कायम राखली आहे. आठव्या फेरीअखेर नितेश राणे यांना 12,915 मताधिक्य मिळाले.नवव्या फेरीमध्ये देवगड तालुक्याची मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर 12व्या फेरीत नितेश राणेंनी 17944 मतांची आघाडी घेतली होती. तसेच तेराव्या फेरीत 18,432 मतांनी पुढे होते. 15व्या फेरीत नितेश राणे यांनी 21063 हजार, 19व्या फेरीमध्ये 25,203 मताधिक्क्यांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय जवळपास निश्चित असून, फक्त अधिकृत घोषणा होण्याचीच बाकी आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत फटाके फोडून जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. नारायण राणेंबरोबर 25 वर्षं राहिल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. तसेच नितेश राणेंच्या एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीलाही सतीश सावंतांच्या उमेदवारीमुळे रंगत आली होती. शिवसेनेनंही नितेश राणेंना पाडण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, युतीत भाजपाच्या वाट्याचा असलेला या मतदारसंघातही शिवसेनेनं अधिकृत उमेदवार म्हणून सतीश सावंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवली