शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Vidhan Sabha 2019 : महायुतीने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी : जठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:27 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठपैकी केवळ कणकवली हा एकमेव मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असताना शिवसेनेने एबी फॉर्म देऊन महायुतीला तडा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर महायुतीने कारवाई करायला हवी, असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देMaharashtra Vidhan Sabha 2019 : महायुतीने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी : जठारएबी फॉर्म देत शिवसेनेने महायुतीला दिला तडा

वैभववाडी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठपैकी केवळ कणकवली हा एकमेव मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असताना शिवसेनेने एबी फॉर्म देऊन महायुतीला तडा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर महायुतीने कारवाई करायला हवी, असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात जठार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, मंगेश गुरव, दिगंबर मांजरेकर, रत्नाकर कदम, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर आदी उपस्थित होते.

जठार पुढे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील आठपैकी कणकवली हा एकच मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला आहे. येथे कोण उमेदवार द्यायचा हा आमच्या पक्षाचा प्रश्न होता. परंतु शिवसेनेने विश्वासघात करीत सतीश सांवतांना एबी फॉर्म देऊन महायुतीला तडा देण्याचे काम उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

सतीश सावंत यांची उमेदवारी ही बेकायदेशीर आहे. वेळ गेलेली नाही. शिवसेनेने अजूनही कणकवलीतून माघार घ्यावी. आम्ही उर्वरित दोन मतदारसंघातून अपक्षाची माघार घ्यायला तयार आहोत.राजन तेली व प्रमोद जठार यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. त्याबाबत विचारले असता हा फेक मेसेज असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत माझा पक्ष माझ्यावर कधीही कारवाई करणार नाही, असे जठार यांनी सांगितले.

पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आदेश धुडकावून स्वत:ला पक्षाचे पदाधिकारी समजणारे अतुल रावराणे, संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे आणि कणकवलीचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत हे पक्षाच्या विरोधात काम करून निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत.

या चौघांच्या हकालपट्टीचा एकमुखी ठराव जिल्हा कार्यकारिणीत झाला असून तो आपण प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे. १५ रोजी त्या चौघांवर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे जठार यांनी सांगितले.नगरपंचायतीत पारकरांना सेनेने पाडलेकणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संदेश पारकरांसाठी पक्षाने अडीच कोटी रुपये खर्च केला. तरीही ते निवडून येऊ शकले नाहीत. कारण त्यावेळी पारकर यांना पाडण्यासाठी शिवसेनेची स्वाभिमानसोबत छुपी युती होती. हे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणाºया पारकरांना समजत नाही, असा गौप्यस्फोट प्रमोद जठार यांनी केला.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठार