शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला सिंधुदुर्गात, अविनाश पराडकरांची माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 26, 2022 15:29 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सभापती राहुल नार्वेकर यांचा सिंधुदुर्गवासियांतर्फे सत्कार करण्यात येणार

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा भेटीसाठी येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत ते संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. जिल्ह्यातील नावाजलेल्या संस्था व प्रकल्पाची माहितीही ते यावेळी जाणून घेणार आहेत.भारतीय जनता पार्टी ही अधिक लोकभिमुख व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सामान्य जनतेचा विकास विविध योजनांमधून तळागाळात पोहोचला पाहिजे यादृष्टीने ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे अधिकृत सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती भाजपा सोशल मीडिया रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांनी दिली आहे.राहुल नार्वेकर यांनी  गोवा येथे डिचोली विधानसभा मतदार संघात भेट दिली. यावेळी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डिचोली भाजपाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे मीडिया संयोजक अविनाश पराडकर व पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेत जिल्ह्यातील सद्यस्थिती व समस्यांबाबत चर्चा केली. सिंधुदुर्ग भेटीसाठी आमंत्रण दिले. सभापती राहुल नार्वेकर यांनी ६ नोव्हेंबरला सावंतवाडी व कुडाळ तालुक्यांना भेट देण्याचे मान्य केले आहे.नार्वेकर हे सावंतवाडी, पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांची महाराष्ट्र विधानसभा सभापतीपदी झालेली निवड ही सिंधुदुर्गवासीयांसाठी आनंदाची व अभिमानस्पद घटना आहे. यानिमित्ताने त्यांचा या भेटीदरम्यान सिंधुदुर्गवासियांतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRahul Narvekarराहुल नार्वेकर