शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिवसेना आणि  नारायण राणे यांच्यातील वाद नक्कीच संपेल, दीपक केसरकर यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 16:26 IST

नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशानंतर शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते आणि राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे.

सावंतवाडी - राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज भाजपात विलीन केला. सोबतच पुत्र निलेश राणेंसह भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान, नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशानंतर शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते आणि राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपतील, असे केसरकर यांनी म्हटले आहे. राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की, ''नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपतील. नारायण राणे आता योग्य पक्षात गेले आहेत. त्यामुळे त्यांचे आणि माझे वैरसुद्धा संपेल. मात्र आता नारायण राणे यांनी संघाची विचारधारा आणि तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

दरम्यान, गेल्या काही काळापासून तारीख पे तारीख करत रेंगाळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपातील विलीनीकरण अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले. यावेळीच नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्याची घोषणा केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी नारायण राणे म्हणाले की, ''गेल्या काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर बोलता मिळालं आहे. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. अशी घोषणा राणेंनी केली.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे