शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'नितेश राणेंचा विजय एकतर्फी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 14:35 IST

'एक नंबरचे मताधिक्य आपल्याला मिळेल!'

कणकवली  :  माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आपल्या कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नारायण राणे यांच्या पत्नी निलमताई राणे, उमेदवार नितेश राणे, नंदिता नितेश राणे, प्रियांका निलेश राणे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.यावेळी नारायण राणे म्हणाले, 'या निवडणुकीत नितेश राणे यांचा एकतर्फी विजय होणार आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि नितेश राणे यांनी लावलेला कामाचा धडाका पाहता नितेश राणे यांचा विजय निश्चित आहे.

एक नंबरचे मताधिक्य आपल्याला मिळेल !आपण गेल्या पाच वर्षात केलेली कामे आणि भाजपाची साथ यामुळे विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. महाराष्ट्रातील  एक नंबरचे मताधिक्य आपल्याला या मतदार संघातून  मिळेल, असे  नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

नितेश राणे 2014च्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते. तेव्हा भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत नितेश राणे भाजपाच्या तिकीटवर निवडणूक लढवत आहेत. राज्यात शिवसेना-भाजपाची महायुती आहे. पण, शिवसेनेने सिंधुदुर्गात युतीधर्म बाजूला सारून नितेश राणे यांच्याविरोधात सतीश सावंत यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक नितेश राणेंसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

राज्यात एक वाजेपर्यंत 19.47 टक्के मतदान महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या १३व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सुमारे 9 कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यातील दिग्गजांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. एक वाजेपर्यंत राज्यात 19.47 टक्के मतदान झाले आहे. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी 3237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग