शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 14:39 IST

कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आज कणकवलीत झाली.

कणकवली/ मुंबई -  विरोधी पक्षनेते म्हणून नारायण राणे यांनी आक्रमकपणे काम केले होते. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सुरुवातीलापासूनच  मिळाले आहे. आज त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचा संपूर्ण परिवार भाजपामध्ये दाखल झाला आहे याचा आनंद आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आज कणकवलीत झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले, 'नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत अनेक दिवसांपासून विचारणा होत होती. मात्र नारायण राणे हे कधीच भाजपावासी झाले होते. तसेच नितेश राणेंनाही उमेदवारी देताना त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले होते. त्यामुळे आता केवळ स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाचा प्रश्न उरला होता. अखेर हे विलिनीकरण कणकवली येथे करण्याचा निश्चित करण्यात आले. त्यानुसार आज पक्षप्रवेश झाला आहे.''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ''नारायण राणेंशी सुरुवातीपासूनच माझे चांगले संबंध होते. नारायण राणेंनी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक काम केले होते. विरोधी पक्षात असताना त्याचे मार्गदर्शन सुरुवातीपासूनच लाभले. आज राणेंचा संपूर्ण परिवार भाजपावासी झाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षाविस्तारासाठी होईल,''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या मतदारसंघात भाजपाचाच विजय निश्चित आहे. येथे सुमारे 65 ते 70 टक्के मतदान भाजपाला होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक शांतपणे लढावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षांतील कारभारापेक्षा आम्ही पाच वर्षांत अधिक चांगले काम केले आहे. कोकणाच्या विकासासंदर्भात काही प्रश्न आहेत. त्यापैकी सीवर्ल्डचे काम येत्या दोन वर्षांत करून दाखवू. तसेच नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक सिंधदुर्गात घेतली जाईल, असे आश्वासनही मुख्यंत्र्यांनी दिले. त्याबरोबरच कोकणातून वाहून जाणारे पाणी अडवून कोकणाला टँकरमुक्त करण्याचे काम पुढील काळात केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे kankavli-acकणकवली