शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2024: कोकणसाठी छप्पर फाडके निधीची तरतूद, सिंधुदुर्गात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 28, 2024 15:56 IST

वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पालाही मंजुरी

सिंधुदुर्ग : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प घोषित करून सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना मोठे गिफ्ट दिले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प, वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी आणि उद्योग ट्रेनिंग सेंटर प्रकल्पातून १० हजार तरूणांना रोजगार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले आहेत. विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. कोकणासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अजितदादांनी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करून कोकणवासियांची यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारण्यात येणार असून यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या स्कुबा डायविंग सेंटरच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.मागील सहा महिन्यांपूर्वी वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पावरून मोठे वादळ उठले होते. हा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प वेंगुर्ला येथेच होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यावेळी जाहीर केले होते. आता वेंगुर्ला येथील याच पाणबुडी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे‌  माजी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मंजूर केले होते. या केंद्रासाठी देखील भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर असलेल्या कातळ शिल्पांच्या संवर्धनासाठी युनेस्कोकडे पाठपुरावा करणार असल्याचेही अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. रत्नागिरी, सिंधुदुर्गात ४३० खाटांचे रुग्णालय उभारणार असल्याचे अजितदादांनी जाहिर केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvidhan sabhaविधानसभाAjit Pawarअजित पवारkonkanकोकण