शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

आमदार वैभव नाईक यांची ३२.५८ कोटींची संपत्ती, नावावर पाच प्रलंबित फौजदारी खटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 19:03 IST

कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उद्धवसेनेकडून आगामी विधानसभेसाठी निवडणूक अर्ज गुरुवारी दाखल केला. यामध्ये त्यांनी ...

कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उद्धवसेनेकडून आगामी विधानसभेसाठी निवडणूक अर्ज गुरुवारी दाखल केला. यामध्ये त्यांनी जंगम व स्थावर अशी एकूण ३२ कोटी ५८ लाख ३२ हजार ५९९ रुपयांची संपत्ती नमूद केली आहे. त्यांच्यावर जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्यात पाच फौजदारी खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी या प्रक्रियेतील शुभारंभ आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. दाखल केलेल्या अर्जात त्यांनी आपल्या स्थावर व जंगल मालमत्तेचे विवरण दाखवले आहे.

जंगम मालमत्तेमध्ये..यानुसार जंगम मालमत्तेमध्ये त्यांनी स्वतःच्या नावे ७ कोटी ३१ लाख २ हजार २१५ रू. तर पत्नीच्या नावे ३ कोटी ९२ लाख ८३ हजार ८४ रू. तर सामायिक मालमत्तेपैकी ९ लाख ८६ हजार ७५४ रू एवढ्या मालमत्तेचे विवरण दाखवले आहे. यामध्ये फॉर्च्युनर कार, स्कॉर्पिओ, जेसीबी या मालमत्तेचे ४३ लाख ३० हजार ९२४ रू. त्यांच्याकडे स्वतःकडे २८१ ग्रॅम सोने असून त्याची किंमत २२ लाख ६२ हजार ८५८ रू. तर पत्नीकडे ४११ ग्रॅम सोने असून त्याची किंमत ३४ लाख ९७ हजार १२२ रुपये आहे. त्यांनी पत्नी व स्वतःचे नावाने ९१ लाख ७० हजार ३८१ रू कर्ज घेतल्याचे अर्जात नमूद आहेत.

स्थावर मालमत्तेमध्ये..स्थावर मालमत्तेमध्ये स्वतःच्या नावे शेतजमीन, घर अशा स्वरूपाच्या मालमत्तेचे ११ कोटी ३९ लाख, ८० हजार ३०० रू तर पत्नीचे नावे २ कोटी ५२ लाख ५१ हजार, तर सामायिक मालमत्तेत ७ कोटी ६० लाख रुपये एवढी मालमत्ता आहे.

पाच प्रलंबित फौजदारी खटलेआमदार वैभव नाईक यांच्यावर एकूण पाच प्रलंबित फौजदारी खटले आहेत. यामध्ये कुडाळ पोलिस ठाणे येथे ३, कणकवली पोलिस ठाण्यात १ तर मालवण पोलिस ठाण्यात एक अशा ५ फौजदारी खटल्यांचा समावेश आहे, अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kudal-acकुडाळVaibhav Naikवैभव नाईक