शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

Vidhan Sabha Election 2024: दीपक केसरकरांसाठी ठरणार प्रतिष्ठेची लढाई, बंडखोरामुळे डोकेदुखी 

By अनंत खं.जाधव | Updated: November 12, 2024 17:48 IST

अनंत जाधव  सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत ...

अनंत जाधव सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली, तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या व  भाजप बंडखोर उमेदवारांमुळे येथे चौरंगी लढत होणार आहे. शिंदेसेनेचे दीपक केसरकर निवडणूक रिंगणात आहेत. तर त्याचे पारंपारिक विरोधक उद्धवसेनेचे राजन तेली उभे आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्चना घारे-परब यांनी बंडखोरी केल्यामुळे तेली यांची डोकेदुखी वाढली आहे. तर भाजपच्या विशाल परब यांची बंडखोरी केसरकर यांना डोकेदुखी ठरतना दिसत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा निसर्गाच्या विविधतेने नटलेला आहे या मतदारसंघात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात गोवा कर्नाटक ची सीमा या मतदार संघाला लागून आहे. तर वेगुर्लेला अथांग असा समुद्र किनारा तर सावंतवाडी दोडामार्गला सह्याद्री असे या मतदार संघाचे वर्णन करण्यात येते.या मतदारसंघाचे गेले पंधरा वर्षे दीपक केसरकर हे प्रतिनिधित्व करतात मात्र मागील पंधरा वर्षात अनेकांनी दावेदारी केली पण त्यांना येथील मतदारांनी स्वीकारले नाही. केसरकर यांनीही तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात त्यातील दोन वेळा त्यांनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली सध्या ते शिंदे सेनेकडून आपले नशीब आजमावत आहेत.तर दुसरीकडे केसरकर यांचे पारंपारिक विरोधक राजन तेली यांनी दोन वेळा अपक्ष तर यावेळी उध्दव सेनेकडून उभे ठाकले आहेत.मात्र या महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या लढाईत अपक्ष उमेदवारांनी मात्र ट्विस्ट आणला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी झाल्याने दोन्ही पक्षांना आपले कार्यकर्ते व पदाधिकारी अपक्ष उमेदवाराकडे जाऊ नये म्हणून मोठी कसरत करावी लागणार आहे. सध्या भाजप ने केसरकर यांच्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. मात्र तेलींसाठी काँग्रेसची फौज कामाला येताना दिसत नाही.

मतदार संघातील समस्या

  • सावंतवाडी मतदार संघातील प्रमुख समस्या ही रोजगाराची असून अनेक युवक युवती या रोजगारासाठी गोव्याला जातात येथे मोठा उद्योग व्यवसाय नाही
  • सावंतवाडी मतदारसंघातील दुसरी समस्या ही आरोग्याची असून प्रत्येक रूग्णाला गोवा बाबुळीला जावे लागते. 

सावंतवाडीतील मतदार संख्या एकूण मतदार: २ लाख ३० हजार  पुरूष : १ लाख १४ हजार ६४८महिला : १ लाख १५ हजार ३५४

२०१९ च्या निवडणुकीत मिळालेली मते

  • दीपक केसरकर (शिवसेना) ..६९७८४
  • राजन तेली (अपक्ष)...५६५५६
  • बबन साळगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस) ५३९६

अपक्ष उमेदवार 

  • विशाल परब (भाजप बंडखोर)
  • अर्चना घारे-परब (राष्ट्रवादी शरदचंद्र)
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024