शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी, सिंधुदुर्गात काँग्रेसची पाटी कोरीच; राजापुरात बंडाचे निशाण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 30, 2024 19:07 IST

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा कोकण म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची ओळख होती; मात्र ...

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा कोकण म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची ओळख होती; मात्र लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीतून रत्नागिरीतील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन म्हणजे एकूण आठपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेसची पाटी कोरी राहिली आहे.यामुळे कट्टर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून, पक्षाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. याच रागातून राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.कोकणातील नेत्यांना आमदार, खासदार, महामंडळाचे अध्यक्ष, राज्यातील विविध मंत्रिपदे आदी पदे मिळाली आहेत.खासदार नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना म्हणजे सन २००५ साली राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे त्यांच्याकडे होती. सन २००५ ते २०१४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने काँग्रेसकडे होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा हात जगन्नाथ ठरला होता. आमदार नितेश राणे यांच्या रूपाने कणकवली विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये काँग्रेसचा कोकणातील एकमेव आमदार होता. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही राज्यात सर्वत्र काँग्रेसचा पराभव झाला असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसचा मोठा विजय झाला होता.

नेतृत्वाकडूनही दुर्लक्षनारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत स्वत:चा स्वाभिमान पक्ष काढला आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसची पूर्णत: वाताहत झाली. राणेंसोबत जे काँग्रेसमध्ये गेले होते. ते पुन्हा राणेंच्या समवेत त्यांच्या पक्षात गेले आणि काही काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते होते ते देखील राणेंसमवेत गेले. या सर्व घटनांकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मात्र वेळोवेळी दुर्लक्ष केले.

राजापुरात काँग्रेसमधून बंडाचे निशाणकाँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांना राजापूर मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा वाटत होती. मागील दोन वर्षांपासून ते त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. महाविकास आघाडीत रत्नागिरीतील पाच मतदारसंघापैकी चार मतदारसंघ उद्धवसेना आणि एक मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला. त्यामुळे अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत राजापूरमधून बंडाचे निशाण रोवले आहे.

आघाडीचेच काम करणारराज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन व्हावे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्ह्यात एकही जागा काँग्रेसला मिळाली नसली तरी आम्ही नाराज न होता आघाडी धर्म पाळणार असून आघाडीच्या उमेदवारांसाठी मनापासून काम करणार आहोत. - प्रदीप मांजरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष, कणकवली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीkankavli-acकणकवलीcongressकाँग्रेसthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024