शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 05:25 IST

Maharashtra Assembly Election 2024 : मळगाव रेल्वे स्थानक परिसरातील घटना : हल्लेखोर ताब्यात 

Maharashtra Assembly Election 2024 : सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधातील भाजपचे  बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.  यात त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री मळगाव रेल्वेस्टेशन परिसरात घडली. दरम्यान, हल्ल्यानंतर हल्लेखोराला स्थानिक लोकांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून उशिरापर्यंत हल्या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.

मळगाव येथील नरकासुर स्पर्धा आटोपून विशाल परब हे घरी परतत असताना सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या गाडीवर बांबूने हल्ला केला या अचानक घडलेल्या घटनेनंतर परब थोडे चक्रावून गेले पण लागलीच गाडी थांबवून हल्लेखोराला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ड्रायव्हरने चपळाईने गाडी बाजूला घेतल्यानेच विशाल परब यांचा जीव वाचला तसेच हल्ल्याचा प्रयत्न फसला हल्लेखोराने घटनेनंतर जवळच्या जंगलात धाव घेण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या स्थानिक युवकांनी पाठलाग करून हल्लेखोराला बाजूच्या झाडीतून ताब्यात घेतले. 

संतप्त युवकांनी त्यांची चौकशी केली असता त्याने आपण झारखंडमधील असल्याचे आणि आपल्याला कोणीतरी हे काम सांगितल्याचे हिंदीतून बोलत कबूल केले.आपल्याला गाडीतून सोडून कोणीतरी इथे सोडत हल्ला करायला सांगितले असल्याचे त्याने स्थानिक युवकांजवळ कबूल केले. जमावाने याची कल्पना पोलिसांना दिली आहे.विशाल परब हे महायुतीत बंडखोर  उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे हा घातपाताचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी याचा योग्य तपास करावा अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर विशाल परब यांनी दिली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024sawantwadi-acसावंतवाडी