शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी काळाची गरज - विनायक राऊत

By सुधीर राणे | Updated: March 5, 2024 18:07 IST

सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करूया

कणकवली: लोकसभेची निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे. पुन्हा सत्तेत येण्यापासून भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीही काळाची गरज आहे. लोकसभा ते अगदी ग्रामपंचायत निवडणुकीतही ती कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करूया.कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले. कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या 'लेखा जोखा' या कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार वैभव नाईक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,जान्हवी सावंत, नीलम सावंत,अतुल रावराणे,संग्राम प्रभुगावकर, भाई गोवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, रेवती राणे, अर्चना घारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,विकास सावंत, साक्षी वंजारे, नागेश मोरये,आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राऊत म्हणाले, संसदपटू बॅ. नाथ पै,मधू दंडवते, सुरेश प्रभू, सुधीर सावंत या माजी खासदारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत मी काम केले आहे. विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा जनतेच्या प्रश्नांवर  संसदीय सर्व आयुधे वापरून आवाज उठविला आहे. लवासा सारखे आंबोली येथे २७ बंगले बांधले आहेत. तिथे दीपक केसरकर सिंधूरत्न योजनेमधून रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करीत होते. त्याचा भांडा फोड आम्ही केला. प्रमोद जठार माझ्यावर टीका करीत आहेत. मात्र, रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली सामान्य जनतेला देशोधडीला लावून भूमाफियाना साथ देणाऱ्यांना मी विरोध केला. त्यामुळे मी खलनायक आहे. जनतेच्या हितासाठी मी यापुढेही लढत राहीन, मग मला कितीहीवेळा खलनायक म्हटले तरी चालेल. संसदेत मी आवाज उठवल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाली, हे लक्षात ठेवावे.आम्ही एकसंघ महाविकास आघाडीमध्ये कोणीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही एकसंघ आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचे चार मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना इथे आणावे लागते, हे दुर्दैव आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात ठेवावे की, त्यांचे राज्य आमच्या लोकांवर आवलंबून आहे.त्यामुळे आधी गोवा उभारा आणि मग सिंधुदुर्गात या. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत बेसावध आणि बेफिकीर राहू नये,प्रत्येक घराघरात जावून आपला विचार पोहचवावा.भाजप नेते तसेच राणे कुटुंबीय माझ्यावर टीका करतात. मात्र,  गेल्या १० वर्षात वडिलोपार्जित जमीनीपेक्षा माझी किती जमीन वाढली आहे. ते मला दाखवावे. तसेच वाढलेली जमीन असेल तर राणे कुटुंबीयांनी ती घ्यावी. मंत्रीपद भोगूनही उदय सामंत यांना जे शक्य झाले नाही ते आम्ही करून दाखवले असेही ते म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईक तसेच महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी