लोटेत अपघात, दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: October 30, 2016 23:06 IST2016-10-30T23:06:26+5:302016-10-30T23:06:26+5:30

ग्रामपंचायत सदस्या गंभीर जखमी

Lot casualties, two-wheelers killed | लोटेत अपघात, दुचाकीस्वार ठार

लोटेत अपघात, दुचाकीस्वार ठार

आवाशी : कामे आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला अपघात होऊन प्रशांत हुमणे (वय ३२, रा. लोटे) हा तरूण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई-गोवा महामार्गावर लोटे येथील गुणदे फाट्यावर ट्रक मागे घेतला जात असताना हा अपघात झाला. प्रशांत यांची पत्नी लोटे ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता हुमणे या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
मुंबईहून एक ट्रक (जीजे-१/सीएक्स ३0५८) लोटे येथील कन्साई नेरॉलॅक कंपनीकडे जात होता. गुणदे फाट्यावर आपण रस्ता चुकल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले. गुणदे फाट्यावरून आतील रस्त्यावर जाण्यासाठी त्याने ट्रक मागे घेण्यास सुरूवात केली. त्याचवेळी मागे प्रशांत हुमणे यांची दुचाकी होती. ते पीरलोटेकडे जात होते. मागे येणाऱ्या ट्रकखाली त्यांची दुचाकी सापडली आणि त्यात ते जागीच ठार झाले.
प्रशांत यांच्यासोबत त्यांची पत्नी प्राजक्ता (२८) याही होत्या. त्या लोटे ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. त्यांना तत्काळ लोटेतील परशुराम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना लगेचच एका खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. (वार्ताहर)
 

Web Title: Lot casualties, two-wheelers killed