शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सागाचे झाड घरावर कोसळून नुकसान, भातशेती, नाचणी शेती कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:15 IST

गेले चार दिवस देवगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊ स पडत आहे. पडेल येथील नामदेव शंकर बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे देवगड बंदरात दाखल झालेल्या सुमारे ७०० हून अधिक नौका समुद्रातील वातावरण स्थिर होईपर्यंत बंदरातच आश्रयाला राहणार आहेत. शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला तरी तालुक्यात १८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भातशेती व नाचणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देघरावर सागाचे झाड कोसळून सहा हजारांचे नुकसान शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या

देवगड : गेले चार दिवस देवगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊ स पडत आहे. पडेल येथील नामदेव शंकर बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे देवगड बंदरात दाखल झालेल्या सुमारे ७०० हून अधिक नौका समुद्रातील वातावरण स्थिर होईपर्यंत बंदरातच आश्रयाला राहणार आहेत. शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला तरी तालुक्यात १८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भातशेती व नाचणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गेले काही दिवस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐन दिवाळीच्या सणामध्येच नागरिकांच्या उत्साहावर विरजण टाकले आहे. शुक्रवारी रात्री पडेल येथील नामदेव बाणे यांच्या राहत्या घराच्या छपरावर सागाचे झाड पडून सुमारे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच रस्त्यांच्या बाजूच्या संरक्षण भिंती व रस्त्यांच्या साईडपट्ट्या खचण्याचे प्रकारही घडले आहेत. पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.देवगड तालुक्यामधील बहुतांश गावांमध्ये आपल्या उदर निर्वाहापुरती भातशेती व नाचणी शेती केली जाते. सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर भातशेती व दीड हजार हेक्टरवरती नाचणी शेती केली जाते. यावर्षी मुबलक प्रमाणात सुरुवातीपासून पाऊस पडत असल्याने भातपीक चांगले आले होते. मात्र, हातातोंडाशी आलेल्या भातपीक कापणीच्यावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भातशेतीचे व नाचणी शेतीचे पूर्णत: नुकसान झाले आहे.तालुक्यातील मळेशेतीच्या ठिकाणी भातशेती कुजून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील विजयदुर्ग दशक्रोशीतील काही गावांमधील परिस्थितीही काहीशी अशीच आहे. अतिवृष्टीमुळे नाचणी शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहासाठी केली जाणारी देवगड तालुक्यामधील भात व नाचणीशेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांसमोर यावर्षी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी