शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डवे येथील मशिदीच्या फंडपेटीतील पैसे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:05 IST

बोर्डवे-मुस्लिमवाडी येथील जुम्मा मशिदीमधील फंडपेटीतील ३ हजार रुपये दोन संशयित चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबोर्डवे येथील मशिदीच्या फंडपेटीतील पैसे लंपासदोन चोरट्यांना ग्रामस्थांनी पाहिले : कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार

कणकवली : बोर्डवे-मुस्लिमवाडी येथील जुम्मा मशिदीमधील फंडपेटीतील ३ हजार रुपये दोन संशयित चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोर्डवे मुस्लिमवाडी येथे कुतुबुद्दीन इस्माईल शेख राहतात. जुम्मा मशिदमध्ये नमाज व धार्मिक कार्यक्रम ते करतात. या मशिदीमध्ये प्रवेश करून २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तेथीलच दोन व्यक्तीनी कुलूप न लावलेल्या फंडपेटीतून पैसे चोरून नेले आहेत, असा फोन कुतुबुद्दीन यांना त्यांचा भाऊ आसिफ शेख यांनी केला. तसेच त्या दोन संबंधित व्यक्ती चोरी करून जात असताना काही लोकांनी त्यांना पाहिले होते.

त्यानंतर लगेचच कुतुबुद्दीन शेख मशिदीमध्ये आल्यानंतर वाडीतील सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन मशिदीमध्ये चोरी झाल्याची खात्री केली. तसेच पैसे चोरणाऱ्या दोन्ही संशयितांकडे सर्वजण गेले असता त्यांचे घर बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच दोन संशयितांनी चोरी केली असावी अशी शंका व्यक्त केली.

संबंधित फंडपेटीतील रक्कम दरवर्षी आॅगस्ट महिन्यात मोहरम सणासाठी वापरली जाते. त्यानंतर फंडपेटी गेल्या चार महिन्यांपासून उघडण्यात आली नव्हती. अंदाजे ३ हजार रुपयांची रक्कम त्या फंडपेटीत जमा झाली असावी.ही रक्कम त्या दोघा संशयितांनी लंपास केल्याचे कुतुबुद्दीन शेख यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे संशयितांविरोधात चोरी केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग