शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:21 IST

राजकोट पुतळा दुर्घटनेत आपटेवर गंभीर गुन्हा दाखल

मालवण : मागच्या आठवड्यात मालवण येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार असून, गेल्या आठ दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत, मात्र, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्याविरुद्ध मंगळवारी ‘लूक आउट’ नोटीस जारी केली आहे.राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्यासह बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटीलवर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमांतर्गत मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चेतन पाटील मालवण पोलिसांच्या कोठडीत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अजित पाटील यांनी दिलेल्या तकारीनुसार, राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन हा पुतळा शतकानुशतके सुस्थितीत सुरक्षित व दिमाखाने उभा राहण्याच्या दृष्टीने परिपूर्ण व त्यासंदर्भात आवश्यक अशी सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक होते; परंतु शिल्पकार व बांधकाम सल्लागार यांनी हा पुतळा कोसळला तर पुतळ्याच्या जवळील पर्यटक व इतर लोकांचा मृत्यू होईल, तसेच अपरिमित जीवित व वित्तहानी होईल याची पूर्ण जाणीव असतानाही अभ्यास न करता पुतळ्याची निकृष्ट दर्जाने उभारणी केली.तरी जयदीप आपटे व डॉ. चेतन पाटील यांनी एकमेकांच्या संगनमताने हे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर मालवण पोलिसांत भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३(५), ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराrajkot-pcराजकोटShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPoliceपोलिस