लोकसभाध्यक्षांनी जपल्या माहेरच्या आठवणी

By Admin | Updated: January 10, 2015 00:23 IST2015-01-09T22:59:47+5:302015-01-10T00:23:44+5:30

सुमित्रा महाजन : सर्वोच्च पदावरील निवडीनंतर प्रथमच चिपळूणला भेट

Lok Sabha Speaker remembers her mother | लोकसभाध्यक्षांनी जपल्या माहेरच्या आठवणी

लोकसभाध्यक्षांनी जपल्या माहेरच्या आठवणी

चिपळूण : लोकसभेच्या अध्यक्षा व मालघर - चिपळूणच्या सुकन्या असणाऱ्या सुमित्रा महाजन यांनी आज (शुक्रवारी) सकाळी शहरातील विविध मंदिरात जाऊन देवदेवतांचे दर्शन घेतले.
लोकसभेच्या अध्यक्ष झाल्यानंतर सुमित्रा महाजन आज प्रथमच आपल्या माहेरी लोटिस्माच्या शतायु ग्रंथालये व ग्रंथकार अधिवेशन कार्यक्रमासाठी चिपळूण येथे आल्या आहेत. हेलिकॉप्टरने त्यांचे पवन तलाव मैदानावर आगमन झाल्यानंतर नगराध्यक्षा सावित्री होमकळस, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, आदिती देशपांडे, बरकत वांगडे, सुचय रेडीज, राजू कदम व निर्मला चिंगळे, भाजपचे नेते माधव गवळी, सरोज नेने, लोटिस्माचे अध्यक्ष अरविंद जाधव, लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, कार्यवाह बापू काणे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी महाजन यांचे स्वागत केले. त्यानंतर त्या कार्याध्यक्ष देशपांडे यांच्या निवासस्थानी गेल्या. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथे चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर अध्यक्षा महाजन यांनी ग्रामदेवता भैरी जोगेश्वरी, लक्ष्मी केशव मंदिर, राऊत आळीतील गणपती मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या चिपळुणातील शासकीय विश्रामगृहात गेल्या.
शासकीय विश्रामगृहाबाहेर पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार वृषाली पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, जिल्हाप्रमुख सचिन कदम, बाळा कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, राजू देवळेकर, माधवी पोटे, सुरेखा खेराडे आदींनी त्यांचे स्वागत केले.
सायंकाळी महाजन यांनी ग्रंथनगरीला भेट दिली व देव विरेश्वर मंदिरात जाऊन विरेश्वराचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)

जुनी मैत्रिण भेटली अन्...
चिपळूणच्या सरोज नेने या महाजन यांच्या बालमैत्रिण. त्यांच्या भेटीत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Lok Sabha Speaker remembers her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.