शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

Lok Sabha Election 2019 : स्वाभिमान पक्षासमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:36 IST

कणकवली तालुक्यातील मतदारांनी यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंची पाठराखण केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या आठही जागा आणि पंचायत समितीवर एकहाती सत्ता राखण्याचा विक्रम नोंदविण्यास काँग्रेसला मदत केली होती.

ठळक मुद्देस्वाभिमान पक्षासमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान!लोकसभा निवडणूक : कणकवली तालुक्यातील स्थिती

सुधीर राणे 

कणकवली : कणकवली तालुक्यातील मतदारांनी यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंची पाठराखण केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या आठही जागा आणि पंचायत समितीवर एकहाती सत्ता राखण्याचा विक्रम नोंदविण्यास काँग्रेसला मदत केली होती.

सलग चौथ्यांदा कणकवलीत काँग्रेसने आपले एकहाती वर्चस्व राखून शिवसेना, भाजपला चांगलाच धक्का दिला होता. आता नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. या नवीन पक्षासमोर लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकीसारखेच मताधिक्य राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या विधानसभा निवडणुकीतही कणकवली तालुक्यात काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतही कणकवली तालुक्यात काँग्रेसचेच वर्चस्व कायम राहील अशी अटकळ बांधली जात होती.

त्यामुळे त्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना व भाजप स्वतंत्र लढत असले तरी तालुक्यात काँग्रेसला रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १८ जागांवर छुपी युती करण्यात आली होती. शिवसेना-भाजपच्या या रणनीतीमुळे काँग्रेसला त्या निवडणुकीत जोरदार धक्का बसेल अशीही चर्चा होती. मात्र काँग्रेसने तालुक्यातील आठही जिल्हा परिषद मतदारसंघात पंधराशे ते साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळविले होते.कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात ६३९ चे मताधिक्य काँग्रेसला मिळाले होते. तर खारेपाटण जिल्हापरिषद मतदारसंघात २२८१, कासार्डेत १५२८, जानवलीत १३९४, फोंडाघाट ९९०, हरकुळ बुद्रुक १३९१, कलमठमध्ये १४७९चे मताधिक्य काँग्रेस उमेदवारांना मिळाले होते.खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेसला ३८ तर कासार्डे पंचायत समिती मतदारसंघात ८५ मतांनी विजय मिळाला होता. हे मतदारसंघ वगळता तळेरे पंचायत समिती मतदारसंघात १६१९, नांदगाव ४००, जानवली ७८७, बिडवाडी ७४०, लोरे ८८९, फोंडा १९४, हरकुळ खुर्द २९०, हरकुळ बुद्रुक १०२८, वरवडे १४८१, कलमठ ३८५ , कळसुली ३५६, ओसरगाव ४३१, नाटळ १३३९ आणि नरडवे पंचायत समिती मतदारसंघात १०३३ चे मताधिक्य मिळाले होते.विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातून ३ हजार ८९ चे मताधिक्य मिळाले होते.तर जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या श्रीया सावंत १३९४ एवढ्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात विजयी झालेले काँग्रेसचे संजय आंग्रे यांना ३६४० मते मिळाली होती.

हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातून राजलक्ष्मी डिचवलकर यांनी १३९१ चे मताधिक्य घेत विजय मिळविला होता. तर हरकुळ खुर्द पंचायत समिती मतदारसंघातून भिरवंडेचे माजी सरपंच मंगेश सावंत यांनी काँग्रेसकडून लढताना २९० चे मताधिक्य मिळविले होते.स्वाभिमान पक्ष ग्रामीण भागात पहिल्यांदाच निवडणुकीतमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आता काँग्रेसमधून बाहेर पडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आता नवीन पक्षासोबत आहेत. असे जरी असले तरी काँग्रेसची पारंपरिक मते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मिळावीत यासाठी त्या पक्षातील नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने काँग्रेसने आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे काँग्रेसचे असलेले मतदार त्या उमेदवारालाच मतदान करतील हे निश्चित आहे.चिन्ह घराघरात पोहोचविण्याचे आव्हानकणकवली तालुक्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पर्यायाने निलेश राणे यांना मताधिक्य मिळावे यासाठी तसेच नवीन चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे हे मोठे आव्हान त्या पक्षासमोर उभे ठाकले आहे. कणकवली तालुक्यातील मागील निवडणुकीच्या वेळची राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक नेत्यांनी शिवसेना, भाजप पक्षात प्रवेश केले आहेत. त्यांची मदत त्या पक्षांना या निवडणुकीत होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग