एलओआयसीटी प्रशिक्षण आजपासून
By Admin | Updated: February 2, 2015 23:51 IST2015-02-02T22:29:08+5:302015-02-02T23:51:31+5:30
शिक्षण-प्रशिक्षण संस्था : दोन टप्प्यांमध्ये आयोजन

एलओआयसीटी प्रशिक्षण आजपासून
टेंभ्ये : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्ह्यामध्ये एलओआयसीटी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. नववी व दहावीला अध्यापन करणाऱ्या इंग्रजी व गणित विषयांव्यतिरिक्त सर्व विषय शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. दुसरा टप्पा ९ ते १३ फेब्रुवारी या दरम्यान घेतला जाणार आहे. सर्व शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेतील नववी व दहावीला अध्यापन करणारे ५० टक्के शिक्षक पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित ५० टक्के शिक्षक दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रशिक्षणार्थींची संख्या लक्षात घेऊन त्या त्या तालुकास्तरावर केेंद्राची निश्चिती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात एकूण २० केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. राजापूर तालुक्यात नाटे हायस्कूल, नाटे, राजापूर हायस्कूल व ओणी हायस्कूल, लांजा तालुक्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, लांजा, रत्नागिरी तालुक्यासाठी पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, फाटक हायस्कूल, रत्नागिरी व तात्यासाहेब मुळ्ये हायस्कूल, जाकादेवी, संगमेश्वर तालुक्यासाठी तु. ग. गांधी विद्यालय, साखरपा, न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख व कोळंबे हायस्कूल, चिपळूण तालुक्यासाठी महारष्ट्र हायस्कूल, चिपळूण,
सती हायस्कूल खेर्डी व युनायटेड हायस्कूल चिपळूण, गुहागर तालुक्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे, श्रीदेव गोपाळकृष्ण हायस्कूल, खेड तालुक्यासाठी एमआयबी गर्ल्स हायस्कूल खेड, सहजीवन हायस्कूल खेड, दापोली तालुक्यासाठी ए. जी. हायस्कूल, दापोली व मंडणगड तालुक्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड या केंद्राचा त्यात समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)