शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : आंब्याच्या पेटीमागे लपलेले पुण्यातील प्रवासी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 11:47 IST

महाराष्ट्र सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाईल. मात्र, सीमाबंदी कायम राहणार आहे, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देपुण्यातील प्रवासी त्या वाहनात आढळले, संचारबंदी असतानाही प्रकारफोंडाघाट चेकनाक्यावरील घटना; कसून चौकशी

कणकवली : देशभरात लॉकडाऊन व जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश लागू असताना जिल्ह्याच्या सीमांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची टीम येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करीत आहे.याच पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेकनाक्यावरून जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला यांच्यासह पोलीस नाईक अमित खाडये यांना गोव्याकडून कोल्हापूरला जाणाऱ्या चारचाकीतून (एम. एच. १४, जी. यू. ३९८८) चालकासह अन्य तीन प्रवासी प्रवास करताना आढळून आले.चौकशी दरम्यान ते गणेश रावसाहेब दिघे (३९) व भीमाशंकर अर्जुन टाफळकर (४०) हे पुणे येथील असल्याचे समजले. मात्र, मालवाहतुकीसाठी शासनाचा अधिकृत परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहनामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय जास्त व्यक्तींची वाहतूक कशी करता? असे विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना गाडीसह कणकवली पोलीस स्थानकात आणले व त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आले आहे. कोरोना आजाराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडील मनाई आदेशानुसार लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अमित पंढरीनाथ खाडये यांनी कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.आंब्याच्या पेटीमागे लपलेल्यांना पकडलेचौकशी दरम्यान वाहन चालकाचे नाव सागर दत्तात्रय पवाले (३५, रा. चाकण, माणिक चौक, पुणे) असे सांगण्यात आले. तर चालकाच्या बाजूस असलेल्याचे नाव तुषार चंद्रकांत देवडकर (रा. माणिक चौक, चाकण) असे आहे. मात्र, गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील हौद्यात आंब्याच्या बॉक्सच्या मागे दोन व्यक्ती लपून बसलेल्या पोलिसांना आढळून आल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस