शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वीज भारनियमन केल्यास कार्यालयाला टाळे ठोकू!, भाजपाचा विजवितरण कार्यकारी अभियंत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:49 IST

कणकवली : कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीज भारनियमना विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या ...

कणकवली : कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीज भारनियमना विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी विजवितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर आज, बुधवारी  धडक दिली.कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना वीज भरनियमनाबाबत जाब विचारला. परीक्षा सुरू असताना वीज भारनियमन कराल तर विजवितरणच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या देऊ. वेळप्रसंगी विजवितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना घेराव घालत त्यांच्याशी विविध विषयांबाबत चर्चा केली.राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून वीज भारनियमन  सुरू झाले आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्य वीज भारनियमन मुक्त होते. जिल्ह्यात आणि तालुक्यात सध्या शालेय परीक्षा सुरू आहेत. परीक्षा कालावधीत वीज भारनियमन करून शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असेही भाजपा पदाधिकाऱ्यांनी  ठणकावून सांगितले.कमी विज दाबामुळे चिरेखाण व्यावसायिकांच्या मोटर जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत रिले बदलला नाही तर जळालेलया सर्व मोटर आणून तुमच्या केबिनमध्ये टाकू असे उप-तालुकाध्यक्ष सोनू सावंत यांनी ठणकावले. ब्रेकर खराब असल्यामुळे कमी वीज भाराची अडचण निर्माण होत असल्याचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते म्हणाले. यावेळी दिवसेंदिवस वीज देयकांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यापुढेही अशीच स्थिती राहिल्यास भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला.यावेळी भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, तालुका सरचिटणीस माजी उपसभापती महेश गुरव, पिसेकामते सरपंच सुहास राणे,बबलू सावंत, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, समीर प्रभूगावकर, हनुमंत बोन्द्रे, प्रसाद देसाई, सुशील सावंत, पप्पू पुजारे, विजय कदम, सदा चव्हाण, हरेश पाटील आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजBJPभाजपा