परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात स्थानिक व्यापाऱ्यांची कणकवलीत एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:26 PM2020-03-14T13:26:47+5:302020-03-14T13:34:06+5:30

कणकवली शहरात  एका परप्रांतीय मालकाकडुन १०-१० हातगाडया फळ विक्रीसाठी लावल्या जात आहेत. अशा  हातगाडया लावत असताना त्याला मर्यादा असाव्यात. जर १० गाडया लावल्या जात असतील तर नगरपंचायतने त्याची नोंद करुन त्यांच्याकडून कर गोळा करावा.

Local merchants unite against traditional merchants | परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात स्थानिक व्यापाऱ्यांची कणकवलीत एकजूट

परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात स्थानिक व्यापाऱ्यांची कणकवलीत एकजूट

Next
ठळक मुद्देआठवडा बाजारात कपडे, चप्पल, कडधान्य विकण्यास विरोध ; सोमवारी मुख्याधिकाऱ्यांची व्यापारी घेणार भेट

 

कणकवली : कणकवली शहरात आठवडा बाजार मंगळवारी भरत असतो . या आठवडा बाजारात परप्रांतीय तसेच  बाहेरील व्यापाऱ्यांकडुन कडधान्य, चप्पल, कपडे व इतर साहीत्यांची विक्री केली जात आहे. आठवडा बाजारात केवळ भाजी, कांदे, बटाटे व शेतकऱ्यांचा उत्पादीत माल विक्री करण्याची मुळ संकल्पना आहे. त्यामुळे पुढील काळात आठवडा बाजारात परप्रांतीय व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास बंदी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात कणकवलीतील व्यापाऱ्यांची एकजूट ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच  यासंदर्भात कणकवली नगरपंचायतीचे  मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची  सोमवारी भेट घेण्याचे ठरविण्यात आले.

     कणकवली येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांच्या उपस्थितीत व्यापारी संघाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीला राजू पारकर, दिपक बेलवलकर, राजेश राजाध्यक्ष, नगरसेवक रुपेश नार्वेकर, लिलाधर गोवेकर, हेमंत गोवेकर, भाऊ काणेकर, विलास कोरगावकर, दादा केणी, अनिल अणावकर, शेखर चव्हाण, सुजित जाधव, प्रभाकर कोरगावकर, आबा उचले, सुरेश महाजन, महेश देसाई , नंदू पोरे , रुपेश खाडये, नंदू आळवे, घाडीगांवकर, डामरी , शेखर गणपत्ये, सुहास खानोलकर, दयानंद उबाळे, आनंद पोरे , साई कोदे , सर्वेश शिरसाट , बबन नेरकर आदींसह कणकवली शहरातील १०० ते १५० व्यापारी उपस्थित होते.

        यावेळी कणकवली शहरात जे परप्रांतीय व्यापारी आपली दुकाने घालत आहेत. त्या दुकानांची पुढील काळात मर्यादा ठेवण्याची जबाबदारी संबंधीत परप्रांतीयांनी घ्यावी. त्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी एकजूट ठेवून पुढील काळात नवे दुकान होत असल्यास संबंधितांना रोखण्याची जबाबदारी आपली असल्याचे ठरविण्यात आले. दर रविवारी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. त्यानुसार सर्वांनी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे.

          आठवडा बाजारात परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून भाजी, कांदे, बटाटे व्यतिरिक्त होणारी विक्री थांबविण्यासाठी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सोमवारी सकाळी  ११ वाजता देण्याचे ठरले. यावेळी प्रमुख व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे ठरविण्यात आले.

           ही कारवाई नगरपंचायत कायदेशीररित्या  करेल असे व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांनी सांगितले.
तर स्थानिक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत असेल तर प्रसंगी आंदोलन करण्याची तयारी ठेवावी. परप्रांतीयांची वाढती दुकाने आपल्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे संबंधीत परप्रांतीयांनी आपल्या  दुकानांची संख्या यापुढे वाढणार नाही . याची काळजी घ्यावी. अन्यथा आपण सर्वांची गरज पडल्यास आंदोलन करून तुरुंगात जाण्याची तयारी ठेवली पाहीजे, असे मत सुजित जाधव यांनी मांडले.

          या बैठकीत व्यापाऱ्यांसाठी ग्रुप  इन्शुरन्स दुकान व वैयक्तिक स्वरुपात काढण्यात येणार आहे. त्याकरिता पुढील बैठकीत विमा प्रतिनिधिसोबत चर्चा करुयात. कणकवली शहरात व्यापाºयांकडे दररोज विविध वर्गणीसाठी लोक येतात. त्यासंदर्भात पुढील काळात व्यापारी संघाची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही पैसे गोळा करु नयेत. फक्त कणकवली शहरातील श्री काशिविश्वेश्वर, स्वयंभू मंदिर तसेच इतर मंदिरांच्या कार्यक्रमासाठी व्यापाऱ्यांचा विरोध असणार नाही, अशी भुमिका विशाल कामत यांनी बैठकीत मांडली. त्यांला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला.

          कणकवली शहरात  एका परप्रांतीय मालकाकडुन १०-१० हातगाडया फळ विक्रीसाठी लावल्या जात आहेत. अशा  हातगाडया लावत असताना त्याला मर्यादा असाव्यात. जर १० गाडया लावल्या जात असतील तर नगरपंचायतने त्याची नोंद करुन त्यांच्याकडून कर गोळा करावा. येत्या मंगळवारी बाहेरुन येणाऱ्या  व्यापाºयांना सुचना देवून बाजारपेठेत  शेवटचे बसायला द्यायचे . त्यानंतर पुढील आठवडा बाजारात कोणालाही बसायला न देण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानूमते घेण्यात आला.

-कणकवली व्यापारी संघाच्या बैठक श्री काशीविश्वेश्वर मंदिरात शुक्रवारी झाली . त्यावेळी विशाल कामत यांच्यासह अनेक  व्यापारी उपस्थित होते.

Web Title: Local merchants unite against traditional merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.