हजारो बाधित रूग्णांना जीवदान

By Admin | Updated: July 25, 2014 22:54 IST2014-07-25T22:48:56+5:302014-07-25T22:54:18+5:30

सर्प-विंचू दंश : दिलासादायक उपचारांमुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत घट

Lives for thousands of infected patients | हजारो बाधित रूग्णांना जीवदान

हजारो बाधित रूग्णांना जीवदान

प्रकाश वराडकर - रत्नागिरी , जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विषारी सापांचा दंश व विंचूदंशाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या सव्वा चार वर्षांच्या काळात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सर्पदंशाच्या १३ जणांना, तर विंचूदंश झालेल्या ३ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्हा रुग्णालयातील सुत्रांनी ही माहिती दिली. मात्र, सर्प व विंचूदंश झालेल्या रूग्णांना उशिराने दाखल केलेल्या अनेक रुग्णांचे प्राण अथक प्रयत्नांनंतरही जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाचवले आहेत.
जिल्ह्याच्या विविध भागात सध्या लावणीसह शेतीची कामे सुरू आहेत. याच काळात सर्प व विंचूदंशाचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा विंचूदंश वा सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश झाल्याचे लक्षातही येत नाही. मात्र, त्यानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. विंचूदंशानंतर रक्तदाब कमी जास्त होणे, नाडीचे ठोके कमी जास्त होणे, हृदयाचे ठोके वाढणे, कमी होणे असा त्रास सुरू होतो. त्यामुळे असा त्रास सुरू होताच तातडीने विष उतरविण्यासाठी रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे आवश्यक असते. अनेकदा उशीर झाल्याने रुग्णांच्या शरीरात विष भिनते. त्यामुळे विष उतरवण्यासाठी अधिक प्रमाणात इंजेक्शन्स द्यावी लागतात.
विंचूदंशाचे प्रमाणही जिल्ह्यात अधिक आहे. खेड, दापोली विभागातील गडद काळ्या रंगाचे विंचू अतिविषारी (टॉक्सिक) असतात. गेल्या सव्वा चार वर्षांच्या काळात जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या विंचूदंशाच्या रुग्णांपैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
मात्र, यातील तीनही बळी हे २०१०-११ व २०११-१२ या दोन वर्षांतील आहेत. गेल्या सव्वा दोन वर्षांच्या काळात विंचूदंशाचे रुग्ण वाढले असले तरी योग्य व वेळीच उपचारामुळे हजारो लोकांचे जीव वाचले आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०१३-१४ यावर्षी विंचूदंशाचे ३४०५ रुग्ण, तर सर्पदंशाचे १२१३ रुग्ण दाखल झाले होते. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील अ‍ॅन्टी स्नेक व्हॅक्सीन १५, तर अ‍ॅन्टी स्कोर्पियन व्हॅक्सीन ५ या प्रमाणात ठेवण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयात या औषधांचा साठा अधिक आहे. ज्या रुग्णालयांना वा प्राथमिक आरोग्य केंद्राना या औषधांची अतिरिक्त गरज भासली तर तत्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.

सनसर्पदंश रुग्णदगावलेले
२०१०-११५५०३
२०११-१२५३४४
२०१२-१३३९६३
२०१३-१४५०३२
२०१४-१५१२६१
(एप्रिल ते जून)
एकूण२१०९१३

इंगळी अधिक विषारी...
जिल्ह्यात चिपळूण, खेडमध्ये अतिविषारी इंगळी (विंचू) चे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या भागातील इंगळीदंशाच्या रुग्णांना विषबाधा अधिक होण्याचे प्रमाण पाहता व्हॅक्सीनचे डोस अधिक द्यावे लागतात. कोब्रा जातीचे नाग, धामण, घोणस, मण्यार, फुरसे यांसारखे विषारी साप जिल्ह्यात आढळून येतात. विंचू व सर्पदंश झाल्यानंतर उशिराने रुग्ण उपचारास आला तर काही वेळा त्याला ३० ते ३५ इंजेक्शन्सही द्यावी लागतात. दोन वर्षांपूर्वी डेरवण रुग्णालयात एका रुग्णाला ३५ व्हॅक्सीन्सचा डोस द्यावा लागला होता, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

वर्षसर्पदंश/मृत्यूविंचूदंश/मृत्यू
२०१०-११५५०/३२६९/१
२०११-१२५३४/४१५७/२
२०१२-१३३९६/३१६८/०
२०१३-१४५०३/२३०९/०
२०१४-१५ १२६/११०८/०
(एप्रिल ते जून)
एकूण

Web Title: Lives for thousands of infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.