शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By admin | Updated: March 18, 2015 00:04 IST

बांद्यातील घटना : सहा तासाच्या प्रयत्नानंतर जेरबंद

बांदा : बांदा शहरातील एका विहिरीत मंगळवारी पहाटे भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या पडला. वनखात्याने ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले. या बिबट्याला पाहण्यासाठी शेकडो बांदावासीयांनी गर्दी केल्याने बांदा-दोडामार्ग मार्गावर सुमारे पाच तास वाहतूक खोळंबली होती.तोरप मैदानानजीक असलेल्या चंद्रकांत शेटकर यांच्या घरासमोरील विहिरीत मादी बिबट्या पडला. विहिरीला दगडी कठडा असल्याने, तसेच सुमारे २० फूट खोली असल्याने बिबट्याला विहिरीच्या बाहेर पडता आले नाही. मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत शेटकर पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले असता विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याची कल्पना बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांना दिली.गडगेवाडी येथील विहिरीत बिबट्या पडल्याची वार्ता बांदा शहरात समजताच बांदावासीयांनी मोठ्या संख्येने बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली. वनखात्याचे अधिकारी उशिरा दाखलविहिरीत पाण्याची पातळी कमी असल्याने बिबट्या (विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान) पाण्याच्या पंपावर बसून होता. दरम्यानच्या काळात स्थानिकांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वनखात्याचे अधिकारी ९ वाजता घटनास्थळी आल्याने त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बिबट्याला पकडण्यासाठीचा पिंजरा कुडाळ येथून १० वाजता आणण्यात आला. वनक्षेत्रपाल एस. बी. पाटील, बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर, वनरक्षक पृथ्वीराज प्रताप, अमित कटके, जे. बी. गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ सुशांत पांगम, राजेश विर्नोडकर, सुभाष शिरोडकर, विनायक दळवी, विकी केरकर, स्वप्निल सावंत, सुनील नाटेकर, संदेश पावसकर, मिलिंद सावंत, आनंद गवस, गिरीश नाटेकर यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.आठ तासांहून अधिक काळ पाण्यात राहिल्याने हा बिबट्या आक्रमक झाला होता. वैद्यकीय तपासणीनंतर या बिबट्याला दुपारनंतर सुरक्षितरीत्या आंबोलीच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाहतूक खोळंबलीबिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाल्याने, तसेच या मार्गावर कळणे मायनिंगची वाहतूक करणारे डंपर असल्याने बांदा-दोडामार्ग मार्गावर वाहतुकीचा सुमारे पाच तास खोळंबा झाला. पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, सचिन नावडकर यांनी सहकाऱ्यांंसह वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.