राजापूर तालुक्यातील कोंडिवळे कासारवाडीमधील भरड परिसरात लावलेल्या फासकीत एक जिवंत बिबट्या अडकल्याची घटना
By Admin | Updated: September 17, 2014 23:43 IST2014-09-17T23:20:18+5:302014-09-17T23:43:11+5:30
बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

राजापूर तालुक्यातील कोंडिवळे कासारवाडीमधील भरड परिसरात लावलेल्या फासकीत एक जिवंत बिबट्या अडकल्याची घटना
राजापूर : वन्यजिवांना धोका ठरणाऱ्या फासकीबाबत कठोर उपाययोजना सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करीत फासकी लावण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत. आज, बुधवारी राजापूर तालुक्यातील कोंडिवळे कासारवाडीमधील भरड परिसरात लावलेल्या फासकीत एक जिवंत बिबट्या अडकल्याची घटना घडली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची सुटका करून त्यास सुरक्षित अधिवासात सोडले आहे. काही महिन्यांपूर्वी ओणीमध्ये मुंबई-गोवा महामार्गालगतच असणाऱ्या एका विहिरीत ब्लॅक पँथर जातीचा बिबट्या पडला होता. त्यानंतर आता तेथूनच लगत असणाऱ्या कोंडिवळेमधील जंगलात लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना घडली. सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कासारवाडीतील एक मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर चालली असताना फासकीत अडकलेल्या बिबट्याने तिला पाहून जोरदार डरकाळी फोडली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने हातातील पाण्याची भांडी तेथेच टाकून घरी धूम ठोकली व वाडीतील ग्रामस्थांना ही घटना सांगितली.
लगेचच ग्रामस्थ घटनास्थळाकडे हजर झाले. कोंडिवळे गावचे पोलीसपाटील शांताराम करंडे, ओणीचे पोलीसपाटील संजय लिंगायत यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वनपाल सुधाकर गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह फासकीत अडकलेला बिबट्या हा पाच वर्षांचा असून, तो नर जातीचा आहे. त्याची लांबी सहा फूट, तर उंची सव्वादोन फूट आहे. त्याला एकूण १८ नखे असल्याची माहिती वनक्षेत्रपाल अशोक लाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच बिबट्याचा डावा पाय अडकल्याने गंभीर दुखापत झाली नाही टनास्थळाकडे धाव घेतली. फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका करत त्याला पिंजऱ्यात बंद केले. त्यानंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.फासकीत अडकलेल्या या बिबट्याची सुटका करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडिवळे व ओणी येथील ग्रामस्थांनी मदत केली. यावेळी वनक्षेत्रपाल अशोक लाड, लांजाचे वनपाल लक्ष्मण गुरव, राजापूरचे वनपाल सुधाकर गुरव, संगमेश्वरचे वनपाल तुकाराम यादव, पालीचे वनपाल विलास गुरुवल, वनरक्षक सागर गोसावी, महादेव पाटील, अशोक सांडम, उमेश आखाडे, विक्रम कुंभार, अशोक आरेकर, कृष्णा म्हादये, विजय म्हादये, दामोदर गुरव उपस्थित होते. (प्रतिनिधी)