होडी व्यावसायिकांना लाईफ जॅकेट वाटप
By Admin | Updated: September 7, 2014 23:23 IST2014-09-07T22:03:14+5:302014-09-07T23:23:13+5:30
वैभव नाईक : सी वर्ल्डला लोकांनी विरोध दर्शविला नाही

होडी व्यावसायिकांना लाईफ जॅकेट वाटप
मालवण : सी वर्ल्ड प्रकल्पाला लोकांचा विरोध नाही. मात्र, २८० एकरमध्ये होणारा सी वर्ल्ड १४०० एकरमध्ये केला जात असल्याने त्याला लोकांनी विरोध दर्शविला आहे. थोड्या जमिनीत सी वर्ल्ड करायला लोकांचा विरोध नाही. शिवसेनेचेही तेच मत आहे. शिवसेनेचाही सी वर्ल्डला विरोध नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी मालवण येथे बोलताना केले.
मालवण येथे दोन दिवसांपूर्वी होडी व्यावसायिक व तहसीलदार यांच्यात लाईफ जॅकेट वा
परण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शासनाच्या जाचक अटींचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिकांना शिवसेनेतर्फे लाईफ जॅकेट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, राजू राठोड, अॅड. वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव म्हणाले की, किल्ल्यातील रहिवाशांना तसेच किल्ला प्रवासी होडी व्यावसायिकांना लाईफ जॅकेटची सक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून लाईफ जॅकेटचे शिवसेनेने वाटप केले आहे, असे सांगत ते म्हणाले, आज सिंधुदुर्गात विशेषत: मालवणात पर्यटन वाढत आहे. मात्र शासनाने या भागातील जनतेला कोणत्याही सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. उलट वेगवेगळे कायदे कानून लावले जात आहेत. खरे तर आज मालवणात पर्यटन वाढत आहे. वाढणाऱ्या पर्यटनामुळे पर्यटन व्यावसायिकांना सबसिडी दिली पाहिजे. सुविधा दिल्या पाहिजेत. मात्र तसे न करता शासन व्यावसायिकांवर जाचक नियम लादत आहे.
ते पुढे म्हणाले मच्छिमार असो किंवा पर्यटन व्यावसायिक असो त्यांचे प्रश्न शिवसेनेला माहित आहेत. ज्यांना प्रश्न माहित नाहीत ते तुमचे प्रश्न काय सोडवणार? असा सवाल करीत नाईक म्हणाले, शासनाने आज लाखो रुपये खर्च करून चार हाऊसबोटी बांधल्या त्यातील एक जळली किंवा जाळली हे माहित नाही. मात्र उर्वरित तीन पडून आहेत.
हाऊसबोटी बांधणाऱ्या शासनाने पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांना सबसिडी दिली पाहिजे होती. ती दिली जात नाही. सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. कोकणात जलवाहतूक सुरु व्हावी यासाठी केंद्र सरकार
प्रयत्न करत आहे. यावेळी भाई गोवेकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)