शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोसमी पावसाच्या आगमनाने मच्छिमारी हंगाम बंद, खाडीकिनारी पारंपरिक मासेमारीस प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:26 IST

पावसाळा सुरू झाल्याने बोटीवरील मच्छिमारी हंगाम आता बंद झाला आहे.

देवगड : पावसाळा सुरू झाल्याने बोटीवरील मच्छिमारी हंगाम आता बंद झाला आहे. यामुळे आता तालुक्यातील खाडीकिनाºयालगत असणाऱ्या मच्छिमार बांधवांनी पारंपरिक पध्दतीने मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे.यावर्षी १ जूनपासून बोटीवरील मासेमारी बंद झाली आहे. नारळी पौर्णिमेपर्यंत खोल पाण्यातील मासेमारी करण्यास शासनाची बंदी असते. दरम्यानच्या कालावधीमध्ये मच्छिमार बांधव पारंपरिक पध्दतीने खाडीमध्ये व समुद्रकिनारी भागात जाळ्याने मासेमारी करीत असतात. ही मासेमारी सध्या पारंपरिक पध्दतीने केली जाणारी मासेमारी आहे. देवगड बंदरावर खोल पाण्याच्या मासेमारीच्या काळात मोठ्या लिलाव पध्दतीने मासळीची विक्री केली जाते. यामुळे ही मासळी गावोगावी छोटेमोठे मच्छिमार व्यावसायिक घेऊन जाऊन तिची विक्री करीत असतात. यामुळे गावागावांमध्येही मच्छी उपलब्ध होत असते. देवगड व विजयदुर्ग बंदरांमध्ये लिलाव पध्दतीने मच्छीची विक्री केली जाते. सध्या खोल पाण्यातील मासेमारी शासनाने पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बंद केल्याने विजयदुर्गपासून हिंदळे, मोर्वेपर्यंत खाडीकिनारी भागातील मच्छिमार बांधवांनी पारंपरिक पध्दतीने मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे. काही मच्छिमार जाळ्याने समुद्रात व खाडीमध्ये मासेमारी करतात तर काही ठिकाणी गरी टाकून मासेमारी केली जाते. विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये, हुर्शी, कलंबई, फणसे, पडवणे, वाडातर, मोंड, तिर्लोट, वीरवाडी, कुणकेश्वर, देवगड, मिठमुंबरी, कातवण, हिंदळे, मुणगे, मोर्वे, मिठबांव, वाघोटण, मालपे आदी गावामधील समुद्र किनाºयांवर खाडी असल्याने पारंपरिक पध्दतीने मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे.मच्छिमारी बंद आहे. त्यामुळे मच्छी खवय्यांना मच्छी मिळत नाही. तरीही मुळे व तिसरेदेखील पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळत असतात. यामुळे हॉटेल्समध्ये सुळे मच्छी व तिसरे, मुळे यासारखे पदार्थ हमखास उपलब्ध असतात. 

मच्छिमारी बंदखोल पाण्यातील मच्छिमारी बंद झाल्याने पावसाळ्यामध्ये मासेमारीचा दुष्काळ समजला जातो. यामुळे मच्छीचे भावदेखील गगनाला भिडलेले असतात. पावसाळ्यामध्ये सुळा मच्छी जास्त प्रमाणात खाडीमध्ये मिळते. यामुळे सुरमई, पापलेट खाणाºयांना सुळा मच्छीकडे वळावे लागते. ही मच्छी पावसाळयात जरी जास्त प्रमाणात मिळत असली तरी इतर मच्छी कमी मिळत असल्याने या सुळा मच्छीचा भावदेखील वाढलेला असतो. 

टॅग्स :Rainपाऊस