शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सिंधुदुर्ग किल्ल्यावरून होणार मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ : सुहास सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:56 IST

मराठा समाजाने महाराष्ट्र सरकारकडे केलेल्या मागण्यांची वस्तुस्थितीदर्शक माहिती सकल मराठा समाजाला होण्यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महसुली विभागातून मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथून १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते आणि जिल्हा समन्वयक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग किल्ल्यावरून होणार मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ : सुहास सावंत यांची माहितीमराठा समाजात फूट पडू नये यासाठी महाराष्ट्रभर नियोजन

मालवण : मराठा समाजाने महाराष्ट्र सरकारकडे केलेल्या मागण्यांची वस्तुस्थितीदर्शक माहिती सकल मराठा समाजाला होण्यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महसुली विभागातून मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथून १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते आणि जिल्हा समन्वयक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी दिली.मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा सकल क्रांती मोर्चाच्या आयोजकांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अशोक सावंत, विक्रांत सावंत, बाबा परब, सुहास सावंत, सुधीर धुरी, नीलिमा सावंत, कांचन गावडे, श्वेता सावंत, विनायक परब, सुधीर साळसकर, नाना साईल, सुभाष लाड आदी मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.सुहास सावंत म्हणाले, मुंबई येथे ३१ आॅक्टोबर रोजी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रभर मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने मराठा समाजाच्या किती मागण्या सरकारने पूर्ण केल्या? किती मागण्या प्रलंबित आहेत? तसेच सरकारने मागण्या पूर्ण करण्यासाठी काय कार्यवाही केली? याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक माहिती समाजाला व्हावी तसेच राज्य मागास आयोगाचा मराठा आरक्षणाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने लावण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण येथून १९ रोजी या यात्रेचा शुभारंभ होईल. त्यानंतर २६ रोजी मुंबईतील विधानभवनावर महाराष्ट्रातील सर्व संवाद यात्रा एकत्रित येणार असून अधिवेशन काळात सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.दोन वर्षांपूर्वी कोपर्डी हत्याकांडानंतर मराठा समाज एकवटला. कोपडीर्तील मारेक?्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मराठा आरक्षण कायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्रात सुमारे ५८ मोर्चे, रास्तारोको तसेच जिल्हा बंद अशी अनेक आंदोलने शांततेत झाली.

मात्र आंदोलनातून मराठा समाजाची दिसून आलेल्या एकीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जून-जुलै महिन्यात 'ठोकमोर्चा' निघाले. त्यात १९ हजार मराठा समाजातील युवकांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे राजकीय शक्तींकडून मराठा समाजात फूट पडली जाऊ नये, यासाठी मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडी, कणकवलीत जनसभासिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ १९ नोव्हेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथून होणार आहे. शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन संवाद यात्रेला सुरुवात होईल. यात चारचाकी, दुचाकी तसेच एक सजवलेले वाहन असणार आहे.

संवाद यात्रा मालवण-कुंभारमाठमार्गे वेंगुर्ले, वेंगुर्ले-तुळस-तळवडे-मळगावमार्गे सावंतवाडी-कुडाळ-ओरोस-कसालमार्गे कणकवली अशी निघणार आहे. यात सावंतवाडी व कणकवली येथे जनसभा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दुस?्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.

ही संवाद यात्रा सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई ते मुंबई विधानभवन असा संवाद यात्रेचा मार्ग असून सरकारवर दबाव आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन एड. सुहास सावंत व अशोक सावंत यांनी केले.

टॅग्स :Sindhudurg portसिंधुदुर्ग किल्लाsindhudurgसिंधुदुर्गmarathaमराठा