शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील पहिल्या वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:22 IST

water scarcity, vengurla, tourist, sindhudurgnews वेंगुर्ल्यात येणारे पर्यटक, शहरातील नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये खर्च करून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशीन बसविल्या आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील पहिल्या वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ३० लाख रुपये खर्च, शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशीन

वेंगुर्ला : वेंगुर्ल्यात येणारे पर्यटक, शहरातील नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये खर्च करून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशीन बसविल्या आहेत.

वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करून देणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही सिंधुदुर्गातील पहिलीच नगरपरिषद आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.वेंगुर्ला शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना, शहरातील नागरिकांना तसेच विशेषत: पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने कौन्सिल सभेत वेंगुर्ला बंदर, दाभोली नाका, रामेश्वर मंदिर, हॉस्पिटल नाका व नगरपरिषद इमारत अशा पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशीन सुविधा उभारण्यासंदर्भात ठराव केला व तो प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये निधी मंजूर केला होता. या ३० लाख रुपये निधीतून शहरात पाच ठिकाणी या वॉटर एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत.यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, धर्मराज कांबळी, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, अधीक्षक संगीता कुबल, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.विकासकामांसाठी संघटितपणे प्रयत्नआज बाजारात वीस रुपये लीटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा दर आहे. मात्र, वेंगुर्ला नगरपरिषदेने साधे पाणी एक रुपया लीटर व थंड पाणी एक रुपया अर्धा लिटर असे माफक दर ठेवले आहेत. या मशीनचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.या वॉटर एटीएम मशीनसाठी दीपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष गिरप यांनी केसरकर यांचे आभार व्यक्त केले. वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये सर्वच पक्षांचे नगरसेवक एक असून विकास कामांसाठी संघटितपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईsindhudurgसिंधुदुर्गVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशन