मंडणगडात स्वच्छ भारत अभियान सुरू
By Admin | Updated: November 9, 2014 23:34 IST2014-11-09T21:36:05+5:302014-11-09T23:34:15+5:30
शनिवारी सकाळी मंडणगड ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बाजारपेठ, एस. टी. स्टँड परिसर व बाणकोट रोड परिसर या ठिकाणी स्वच्छता

मंडणगडात स्वच्छ भारत अभियान सुरू
मंडणगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाची हाक दिली आहे. त्यानुसार मंडणगड तालुक्यात शहर स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी मंडणगड ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बाजारपेठ, एस. टी. स्टँड परिसर व बाणकोट रोड परिसर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या अभियानात तहसीलदार कविता जाधव, नायब तहसीलदार विकास गारुडकर, विचूर, येथील एस. टी. आगार व्यवस्थापक पवार, जितेंद्र साळवी, शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर, सरपंच महेंद्र सापटे, उपसरपंच काजल लोखंडे, सदस्य सेजल गोवळे, गोरिवले, ग्रामपंचायत कर्मचारी मनोज मर्चंडे, रमेश दुर्गवले, चंद्रकांत तलार, ग्रामस्थ परशुराम भेकत यांच्यासह शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पसिसर स्वच्छ करण्याबरोबर परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी वारंवार कचरा फेकणाऱ्यांवर यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही देण्यात आले. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील जनतेचाही सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी, देश आपोआप स्वच्छ होईल, अशी प्रतिक्रिया तहसीलदार कविता जाधव यांनी केले आहे. सार्वजनिक ठिकाणे, देवस्थाने, शाळा, अंगणवाड्या, शासकीय व निमशासकीय कार्यालये, मैदाने, समाज मंदीर व त्यांचा परिसर, आठवडा बाजार हे अभियान प्राधान्याने राबवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सार्वजनिक ठिकाणे, देवस्थाने, शाळा, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये, आठवडा बाजार इत्यादी ठिकाणी हे अभियान प्राधान्याने राबविणार.
स्वच्छतेला प्राधान्य देत मंडणगड शहर परिसरातील साफसफाई करण्यावर दिला जातोय भर.
सार्वजनिक स्वच्छतेतून संदेश.