शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: मांगेलीत दरड कोसळली, दुपारनंतर वाहतूक पूर्ववत सुरु 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 31, 2024 16:26 IST

दोडामार्ग : मांगेली कुसगेवाडी येथे भूस्खलन होऊन रस्त्यावर दरड कोसळली. आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरड कोसळल्याने ...

दोडामार्ग : मांगेली कुसगेवाडी येथे भूस्खलन होऊन रस्त्यावर दरड कोसळली. आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरड कोसळल्याने मांगेलीची वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नागरिकांची तसेच शाळकरी विद्यार्थांची गैरसोय झाली. या दुर्घटनेला पाच तास उलटले तरी आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी पोहचले नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर दुपारनंतर बांधकाम विभागाने दरड बाजूला केल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गाव निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसले आहे. याठिकाणच्या चारही वाड्या एकमेकांपासून विखुरलेल्या आहेत. गावात जाण्यासाठी डोंगर पोखरून रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून मांगेलीच्या डोंगरात भूस्खलन होत असल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. फणसवाडीत तर लोकवस्तीच्या माथावर डोंगराला उभी भेग गेली आहे. त्यामुळे इथले रहिवासी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. बुधवारी पहाटे अशीच एक दरड रस्त्यावर आली. कुसगेवाडी येथील रस्त्यावर ही दरड कोसळली. त्यामुळे मांगेलीची वाहतूक ठप्प झाली. परिणामी रात्री देउळवाडित गेलेली एस.टी. बस गावातच अडकून पडली. शाळेत जाणारे विद्यार्थी व कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गावकऱ्यांची गैरसोय झाली. दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने गावाचा तालुक्याची संपर्क तुटला. घटनेची माहिती मिळताच उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे व इतर पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने जेसीबी पाठवले. युद्धपातळीवर काम करून एक तासानंतर माती बाजूला केली व रस्ता मोकळा केला. अखेर तेथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. उपाययोजना करणे आवश्यक याच ठिकाणी तीन वर्षांपूर्वी भूस्खलन झाल्याची घटना घडली होती. आजच्या घटनेत रस्त्यावरून वाहतुक नसल्याने मोठा अनर्थ टळला. रस्त्याच्या वरील बाजूसही डोंगराचा काही भाग खचल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. त्यामुळे पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापनाने यासंबंधी योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlandslidesभूस्खलन