शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन खरेदी, दस्तऐवज नोंदणीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:55 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ अधिकारी व कर्मचारी बेमुदत लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला. तसेच जमीन खरेदी, दस्तऐवज नोंदणीची कामे ठप्प झाली होती.

ठळक मुद्देबेमुदत लेखणी बंद आंदोलन मुद्रांकविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश

सिंधुदुर्ग : नोंदणी व मुद्रांक विभाग संघटनेच्या विविध व न्याय मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले. दरम्यान, जिल्ह्यातील २३ अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला. तसेच जमीन खरेदी, दस्तऐवज नोंदणीची कामे ठप्प झाली होती.नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून गेली तीन वर्षे या कर्मचाºयांच्या विविध मागण्यांबाबत शासनाला निवेदने देण्यात आलेली आहेत. या निवेदनाद्वारे सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तत्काळ करणे, कोरोना महामारीत कर्मचाºयांची ३० टक्के उपस्थिती आवश्यक असताना या विभागातील सर्व कर्मचारी १०० टक्के काम करूनसुद्धा कर्मचाºयांच्या मागणीनुसार त्यांना विमा कवच लागू केलेले नाही.कोरोनामुळे आतापर्यंत ६ अधिकारी व कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. तुकडेबंदी कायद्याने होणाºया या कार्यवाहीबाबत, रेरा कायद्यामध्ये होणाºया कार्यवाहीबाबत, सह दुय्यम निबंधक वर्ग २ व दुय्यम निबंधक श्रेणी १ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याबाबत, हार्डवेअर साहित्याबाबत, इन्कम टॅक्स विवरणपत्र, पोलीस व इतर विभागाकडून मागणी केल्या जाणाºया महिती बाबत, आधार सर्व्हर इत्यादी मागण्यांबाबत तसेच शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने गुरुवारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ अधिकारी व कर्मचाºयांनीबेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे.चौकटकामकाज ठप्प, लक्ष घालण्याची मागणीनोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे या विभागातील कामकाजावर परिणाम झाला आहे.तसेच जमीन खरेदी करणे, दस्तऐवज नोंद करण्याची कामे पूर्णत: ठप्प झाली. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग