शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

Kudal Vidhan Sabha Election 2024: पुत्राने काढला वडिलांच्या पराभवाचा वचपा, राणेंनी पुनश्च मिळविला बालेकिल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 18:43 IST

संदीप बोडवे  मालवण: जिथून नारायण राणे यांच्या कोकणातील राजकारणाची सुरुवात झाली त्या मालवण मध्येच त्यांचा वैभव नाईक यांनी केलेला ...

संदीप बोडवे मालवण: जिथून नारायण राणे यांच्या कोकणातील राजकारणाची सुरुवात झाली त्या मालवण मध्येच त्यांचा वैभव नाईक यांनी केलेला पराभव हा राणे परिवाराच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच नारायण राणे यांचे पुत्र माजी खा. निलेश राणे मालवण कुडाळ मतदार संघातून विधानसभेच्या रिंगणात उतरलेले होते. निलेश राणे यांनी या निवडणुकीत माजी आमदार वैभव नाईक यांचा पराभव करत वडिलांच्या पराभवाची परतफेड तर केलीच आहे परंतु मालवणवरही पुनश्च वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १९९० पासून मालवण म्हणजे राणे असे समीकरण बनले होते. परंतु मागील दहा वर्षात याला तडा गेला होता. हे शल्य उराशी बाळगणाऱ्या निलेश राणे यांनी या मतदार संघात बांधणी करायला सुरुवात केली होती. कोणत्याही परिस्थितीत मालवण कुडाळ मधून वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहून त्यांचा पराभव करायचा असा चंगच निलेश राणे यांनी बांधला होता. मालवण मध्ये राणे विरुद्ध नाईक असाच संघर्ष पहावयास मिळाला. नारायण राणे यांचा येथे वैभव नाईक यांनी केलेला पराभव आणि त्याची परतफेड अशी किनार या निवडणुकीला मिळाली होती. राजकीय विरोधक असलेल्या वैभव नाईक यांच्या मागील दहा वर्ष हातात गेलेला मालवण तालुका पुन्हा एकदा मिळविणे राणेंसाठी सोपे नव्हते. दहा वर्षांच्या वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत साडेसात वर्ष त्यांना सत्तेची मिळाली होती. नाईक यांनी याच जोरावर मालवण वर आपली पकड अधिक मजबूत केली होती. नाईक कुठे कमी पडले..

  • मालवण ते देवबाग पर्यंत बंधाराकम रस्ता करू शकले नाहीत 
  • उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला सी वर्ल्ड प्रकल्पासंदर्भात बोट चेपे धोरण स्वीकारणे.
  • जल पर्यटनासाठी विराट युद्ध नौका समुद्रात प्रस्थापित करण्याच्या प्रकल्पाला प्रतिकुलता दर्शविणे. 
  • मालवण मध्ये पर्यटनाला मोठा वाव असताना पर्यटनासाठी ठोस काम न करणे. 
  • स्वदेश दर्शन योजनेत लक्ष घालून प्रभावी कामं करून न घेणे. 
  • विकासापेक्षा भावनिक राजकारणावर जास्त लक्ष केंद्रित करणे. 
  • आश्वासन देवूनही मालवण बस स्थानकाचे काम पूर्ण न करणे. 

राणे यांच्या जमेची बाजू

  • तरुणांमध्ये आपले नेतृत्व निर्माण करण्यात राणे यशस्वी. 
  • पर्यटन व्यवसायिकांमध्ये आश्वासकता निर्माण करण्यात यश. 
  • मालवणच्या ग्रामीण भागात पकड असलेल्या दत्ता सामंत यांना आपल्या प्रचारात ऐनवेळी सक्रिय करणे. 
  • सर्वसामान्यांशी नाळ असलेला धोंडी चिंदरकर यांच्या सारखा तालुका अध्यक्ष लाभणे. 

मालवण तालुक्यातून मताधिक्यनिलेश राणे यांना मालवण तालुक्यातून ४५५३ मतांनी आघाडी मिळाली. तर मालवण नगर परिषदेमध्ये १३५ चे मताधिक्य मिळाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kudal-acकुडाळNilesh Raneनिलेश राणे Narayan Raneनारायण राणे Vaibhav Naikवैभव नाईक Shiv Senaशिवसेनाthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024